Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांनी केली पंतप्रधानांकडे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी

Spread the love

देशातील कोरोनाविरोधी लढाईत आता अधिक लक्ष्यपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे. पण यासोबतच आर्थिक उलाढालींना अधिक वेग देण्यासाठी देशातील काही भागांमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. ही प्रक्रिया पुढच्या काही दिवसांत सुरू राहील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. करोना प्रादुर्भाव कुठल्या भागात आणि किती प्रमाणात आहे, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. यामुळे आपल्याला अधिक लक्ष्यपूर्वक काम करण्याची गरज आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि नियम पाळण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असं मोदी या बैठकीत म्हणाले.

दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखणं आणि सोशल डिस्टिन्सिंगचं काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे. हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि याद्वारेच आपण करोनाला आटकाव करू शकतो, असं मोदींनी सांगितलं. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या. या संकटात ग्रामीण भाग करोनामुक्त राहिल याची पूरेपूर दक्षता आपण घेतली पाहिजे, असं मोदी म्हणाले. हळूहळू पण विश्वासाने आर्थिक हालचाली सुरू झाल्या आहेत आणि त्या वेग घेत आहेत. आर्थचक्र अधिक गतिमान करण्याची प्रक्रियेवर पुढच्या काही दिवसांत भर देण्यात येणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा १७ मे रोजी संपणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लॉकडाऊनबाबत त्यांची मतं जाणून घेत आहेत. महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे .  दरम्यान तिसऱ्या लॉक डाऊन नंतर पंतप्रधान काय निर्णय घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!