Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या काळातही गुटखा विक्री सुरूच , गुन्हे शाखेकडून ४१ हजारांचा गुटखा जप्त

Spread the love

औरंगाबाद – लाॅकडाऊन मुळे शहरातील काही वस्तीत कोरोनाला न जुमानणार्‍या समूहाकडून गुटखा विक्री तेजीत होत असल्याची खबर गुन्हेशाखेला कळताच पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी अन्न व औषध प्रशासनाला सोबंत घेत पथकाला पाठवून आज दुपारी २वा कारवाई केली.
अब्दुल अजीज अब्दुल रहिम (२४) रा. सिल्कमिल् काॅलनी असे अटक आरोपीचे नाव आहे. काही रेकाॅर्डवरच्या गुन्हैगारांनी कोरोनापासून सावध राहणार्‍या व काळजी घेणार्‍या पोलिस प्रशासनाला टारगेट केल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.वरील गुन्हा हा अशाच समजूतीतून करणार्‍या अब्दुल अजीज ला बेड्या ठोकण्यात आल्या.कोरोनापायी समाजाची काळजी घेणारे पोलिस गाफील असल्याचे गुन्हैगारांना वाटत आहे.पण हा गैरसमज औरंगाबाद पोलिस दूर करंत असल्याचे सूत्रांनी सांगितले.या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.वरील कारवाईत पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड,एपीआय मनोज शिंदे, गौतम वावळे, ए.एस.आय.नंदकुमार भंडारी, पोलिस कर्मचारी संतोष सोनवणे, नंदलाल चव्हाण, अफसर शहा, अन्न व औषध प्रशासनाचे मोहम्मद सिध्दीकी, श्रीराम टापरे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!