Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : पोलिस निरीक्षकाचा मुलगा कोरोनाग्रस्त, भावी सासुरवाडीसहित ५८ होमक्वारंटाईन

Spread the love

औरंगाबाद – एक महिन्यापासून किरकोळ तापाने आजारी असणारा पोलिस निरीक्षकाचा मुलगा आज वाग्दत वर कोरोना बाधित निघाल्या मुळे त्याच्या संपर्कातील ५८ जणांना बन्सीलालनगर परिसरातील हक टाॅवर काॅलनीमधे होम क्वारंटाईन केले. अशी माहिती जिल्हारुग्णालयातील सूत्रांनी दिली. हा मुलगा दिल्लीत संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी गेला होता आणि तो नुकताच औरंगाबादेत परतला होता.
पोलिस निरीक्षकाचा २५ वर्षीय मुलगा एक महिन्यापासून किरकोळ तापाने आजारी होता म्हणून कटकटगेट परिसरातील त्याच्या भावी सासुरवाडीचे लोक  त्याला एक दिवसाआड भेटण्यासाठी येतंच होते. त्यातंच निरीक्षकाच्या त्यामुलाला आज जास्तच खोकला येत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेले.तिथे डाॅक्टरांनी तपासुन मुलगा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे हक टाॅवर परिसरात एकंच खळबळ उडाली महापालिकेने वेदांतनगर पोलिसांच्या मदतीने त्या परिसरातील ५१व भावी सासुरवाडीचे७लोक होम क्वारंटाईन केले.

भारतबटालियनची तुकडीही होम क्वारंटाईन

काही दिवसांपूर्वी सातारा परिसरातील भारत बटालियन ची ९७कर्मचार्‍यांची तुकडी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी पाठवली होती. ती तुकडी आज शहरात परंत आल्यानंतर सातारा परिसरातील श्रेयस इंजीनिअरिंग मधे सर्व जवानांना होम क्वारंटाईन केले आहेव उद्या त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!