Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : Maharashtra : एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक जिल्यातील कोरोनाची वास्तव स्थिती….

Spread the love

महाराष्ट्र १३ हजारांवर….

काल  रविवारी दिवसभरात ६७८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर, मृत्यूची संख्या ५४८ वर गेली आहे. काल  ११५ रुग्ण बरे होऊन, त्यांना घरी सोडण्यात आले असून  आतापर्यंत एकूण २११५ रुग्ण करोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईची संख्या साडे आठ हजाराच्या वर…

दरम्यान मुंबईत करोनाचा कहर कायम असून काल रविवारी दिवसभरात मुंबईत ४४१ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या ३४३वर पोहोचली आहे. तर करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८६१३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत मुंबईतील रुग्णालयांमधून १८०४ रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. धारावीत आज, रविवारी दिवसभरात ९४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तर दोघांचा मृत्यू झाला. धारावीतील करोनाबाधितांची एकूण संख्या ५९० वर पोहोचली असून, मृत्यूची संख्या २० झाली आहे. तर माहीम आणि दादरमध्येही प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. माहिममध्ये १६ नवे करोनाबाधित रुग्ण सापडल्यानं पुन्हा चिंता वाढली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. माहिममधील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६८ वर पोहोचली असून, आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. दादरमध्येही करोनाबाधितांच्या संख्येत आज चार रुग्णांची भर पडली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दादरमधील एकूण करोनाबाधितांची संख्या ५० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.

अकोल्यात दोन महिलांचा मृत्यू तर १२ जणांना लागण

अकोल्यात आज १२ जणांना करोनाची लागण झाली असून दोन महिलांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर यवतमाळमध्ये १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून केवळ एकालाच करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. आज अकोल्यातील ५४ जणांचे अहवाल आले. त्यापैकी ४२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच १ आणि २ मे रोजी अकोल्यात दोन महिलांचा करोनाने मृत्यू झाल्याचं वैद्यकीय प्रशासनाने आज स्पष्ट केलं. या दोन्ही महिला बैदपुरा आणि सिटी कोतवाली येथील रहिवासी आहेत. तर आज सापडलेल्या रुग्णांपैकी तिघेजण मोमीनपुरा, पाचजण बैदपुरा आणि दोघेजण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत.

नवी रुग्ण न आढळल्याने यवतमाळला दिलासा

यवतमाळच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या १४ जणांचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तिचा रिपोर्ट १४ दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसून एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८० च आहे. हे रिपोर्ट्स आज सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. गेल्या २-३ दिवसांपासून रुग्ण वाढीचा वेग मंदावला असला तरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

औरंगाबादेत बाधित महिलेची प्रसूती

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करोनाबाधित गर्भवती महिलेची पहिली नैसर्गिक प्रसूती यशस्वीपणे करण्यात आली. या प्रकारची प्रसूती ही मराठवाड्यातील पहिलीच ठरली आहे. दरम्यान, बाळ व बाळंतीणीची प्रकृती उत्तम असल्याचे घाटीकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद एकूण रुग्णसंख्या : 273 + 8 +1 = 282 ।  10 मृत्यू ।  डिस्चार्ज : 24 । उपचारासाठी दाखल : 247

महाराष्ट्र : एकूण रुग्णसंख्या : 12974 ।  मृत्यू  : 548 ।  डिस्चार्ज : 2115 । उपचारासाठी दाखल : 248


अ.क्र.   जिल्हा/मनपा    बाधित रुग्ण     मृत्यू


१      मुंबई मनपा     ८८००   ३४३

२      ठाणे    ६०     २

३      ठाणे मनपा     ४८८    ७

४      नवी मुंबई मनपा २१६    ४

५      कल्याण डोंबिवली मनपा  २१२    ३

६      उल्हासनगर मनपा       ४      ०

७      भिवंडी निजामपूर मनपा   २१     २

८      मीरा भाईंदर     १४१    २

९      पालघर  ४४     १

१०     वसई विरार मनपा       १५२    ४

११     रायगड  ३०     १

१२     पनवेल मनपा   ५५     २

       ठाणे मंडळ एकूण १०२२३  ३७१

१      नाशिक  १२     ०

२      नाशिक मनपा   ४३     ०

३      मालेगाव मनपा  २२९    १२

४      अहमदनगर     २७     २

५      अहमदनगर मनपा       १६     ०

६      धुळे    ८      २

७      धुळे मनपा      २०     १

८      जळगाव ३४     ११

९      जळगाव मनपा   १२     १

१०     नंदुरबार १२     १

       नाशिक मंडळ एकूण      ४१३    ३०

१      पुणे    ८१     ४

२      पुणे मनपा      १२४३   ९९

३      पिंप्री-चिंचवड मनपा      ७२     ३

४      सोलापूर ७      ०

५      सोलापूर मनपा   १०९    ६

६      सातारा  ३७     २

       पुणे मंडळ एकुण १५४९   ११४

१      कोल्हापूर १०     ०

२      कोल्हापूर मनपा  ६      ०

३      सांगली  २९     ०

४      सांगली मिरज कुपवाड मनपा      २      १

५      सिंधुदुर्ग ३      १

६      रत्नागिरी ११     १

       कोल्हापूर मंडळ एकुण    ६१     ३

१      औरंगाबाद      ५      ०

२      औरंगाबाद मनपा २३९    ९

३      जालना  ८      ०

४      हिंगोली  ४२     ०

५      परभणी  १      १

६      परभणी मनपा   २      ०

       औरंगाबाद मंडळ एकूण   १९७    १०

१      लातूर   १२     १

२      लातूर मनपा    ०      ०

३      उस्मानाबाद     ३      ०

५      बीड    १      ०

६      नांदेड   ०      ०

७      नांदेड मनपा     ३१     १

       लातूर मंडळ एकूण       ४७     २

१      अकोला  १२     १

२      अकोला मनपा   ५०     ०

३      अमरावती       ३      १

४      अमवरावती मनपा ३१     ९

५      यवतमाळ       ७९     ०

६      बुलढाणा २१     १

७      वाशीम  २      ०

       अकोला मंडळ एकूण      १९८    १२

१      नागपूर  ६      ०

२      नागपूर मनपा   १४६    २

३      वर्धा    ०      ०

४      भंडारा   १      ०

५      गोंदिया  १      ०

६      चंद्रपूर  ०      ०

७      चंद्रपूर मनपा    ४      ०

८      गडचिरोली      ०      ०

       नागपूर मंडळ एकूण      १५८    २


१      इतर राज्य      २८     ४


       एकूण   १२९७४  ५४८


शेवटचे अद्यावत दि. ०३ मे २०२०, सायं ६.००

आपलं सरकार

Click to listen highlighted text!