Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : Aurangabad : “त्या ” तरुणाच्या व्हायरल व्हिडिओची महापालिकेकडून दखल , प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

Spread the love

सोशल मीडियावर आलेल्या “त्या” तरुणाच्या व्हिडिओ बाबत औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी खुलासा केला असून कोणत्याही अफवा न पसरवता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संजय नगर मुकुंदवाडी येथील युवकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ बाबत महापालिका प्रशासनाने आपल्या खुलाशात म्हटले आहे की, सदर तरुणाला योग्य ती माहिती नसल्यामुळे त्याने तसे वक्तव्य केले आहे.  वास्तविक पाहता बकऱ्या प्रमाणे गाडीमध्ये सेंटरला नेण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे तसे काहीही झालेले नाही उलट आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळूनच सर्वांना ” हाय रिस्क”  व “लो रिस्कनुसार स्वतंत्ररीत्या घेऊन जाण्यात आलेले आहे. रूग्णाने एमआयटी हॉस्पिटल मध्ये भरती होऊन घेण्याबाबत वक्तव्य केलेले आहे . कोरोना तपासणी बाबतची पद्धती माहीत नसल्यामुळे त्याने असे वक्तव्य केलेले आहे.  सदरील रुग्ण हा सहा ते सात दिवसांपूर्वी कोरोना  विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे पॉझिटिव्ह आलेला आहे .  पदमपुरा येथील केंद्रावरील सुविधांबाबत सदर रुग्णाने काही तक्रारी केल्या आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडळकर यांनी म्हटले आहे . त्यांनी स्वतः एमआयटी वसतिगृह  येथे ०२.०५.२०२०  रोजी भेट दिली असता कुठल्याही प्रकारच्या अडचणी आढळून आल्या नाहीत.  या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत . अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून अफवा पसरू नये व कोरोना बाबत भीतीचे वातावरण निर्माण करू नये. कोरोना  नियंत्रणासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही या खुलाशात करण्यात आले आहे ‌.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!