Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaLatestVirusUpdate : कोरोना ताजी बातमी : एक नजर : जाणून घ्या सायंकाळपर्यंत कोठे किती आढळले रुग्ण ?

Spread the love

औरंगाबाद एकूण रुग्णसंख्या : 273 + 8 +1 = 282 ।  09 मृत्यू ।  डिस्चार्ज : 24 । उपचारासाठी दाखल : 248

मुकुंदवाडी  १६

बायजीपुरा ०१

गुलाबवाडी ०३

संजयनगर , मुकुंदवाडी ०५

१५ मार्च : पहिला रुग्ण


गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे २ हजाराहून अधिक रुग्ण

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे २ हजार ४८७ नवे रुग्ण आढळले असून, ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४० हजार २६३ वर पोहचली आहे. व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

देशभरातील एकूण ४० हजार २६३ करोनाबाधित रुग्णांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २८ हजार ०७० रुग्ण, रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले १० हजार ८८७ जण तर करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ हजार ३०६ जणांचा समावेश आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणा आहे. जे राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून बस सेवा सुरु करण्यात आली आहे. काही विशेष ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत.

सोलापुरात आढळले करोनाबाधित १४ नवे रूग्ण

सोलापुरात आज रविवारी सायंकाळपर्यंत करोनाबाधित नवे १४ रूग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १२८ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील दोन रूग्णांचा अपवाद वगळता आढळून आलेले सर्व रूग्ण शहरातील दाट लोकवस्त्यांच्या झोपडपट्टी भागातील राहणारे आहेत. आज दिवसभरात बापूजीनगरातून चार तर रेस्ट-न्यू ति-हेगाव येथे तीन रूग्ण आढळून आले. शास्त्रीनगरात दोन रूग्ण सापडले. अद्याप १९३ रूग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. दरम्यान, एकूण रूग्णांमध्ये सहा मृतांचा समावेश आहे. तर यशस्वी उपचारानंतर करोनावर मात करणाऱ्या १९ व्यक्तींना पाठविण्यात आले आहे. सध्या १०३ रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका दिवसात १०००० जण परतले रुग्णालयातून घरी

देशातील सर्व नागरिकांसाठी दिलासा आणि चिंता कमी करणारी बातमी आहे. एका दिवसात देशभरात उपचार घेत असलेले १०००० रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.

अकोल्यात करोनाबधितांची संख्या ५२ वर

अकोल्यात आज आणखी १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून आकोल्यातीलआतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहचली आहे

मालेगावात करोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३२५

मालेगाव- मालेगावात नव्याने २७ करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण करोना बाधितांची संख्या आता ३२५ झाली आहे. आज १२८ अहवाल प्राप्त झाले त्यात ९१ नकारात्मक आले असून ३७ अहवाल सकारात्मक आहेत. या सकारात्मक अहवालांमध्ये दहा अहवाल हे जुन्या रुग्णांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे आहेत.

जळगावातील बाधितांची संख्या ४५ वर

जिल्ह्यात शनिवारी चार नवीन करोना रूग्णांची भर पडल्याने बाधितांची एकूण संख्या ४५ पर्यंत गेली आहे. नवीन रूग्णांमध्ये दोन भुसावळ आणि दोन जळगावचे आहेत. कोविड रूग्णालयातील संशयितांपैकी दोघांचे तपासणी अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाले. दोन्ही अहवाल सकारात्मक असून या दोन्ही व्यक्ती भुसावळच्या आहेत. एक ४२ वर्षांचा पुरूष, तर एक ५५ वर्षांची महिला आहे. या दोन व्यक्तींमध्ये एक २४ वर्षांचा तरूण असून तो जळगावच्या मारूतीपेठ येथील रहिवासी आहे. दुसरी व्यक्ती २१ वर्षांची महिला असून ती मूळची चिचोंल (ता.बाळापूर, जि.अकोला) येथील आहे. सध्या ती जळगावच्या समतानगर येथे राहत होती. जिल्ह्यात करोना बाधित रूग्णांची संख्या आता ४५ झाली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!