Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsUpdate : संचारबंदी : शहरात सकाळी ७ पासून कडकडीत बंद, रविवारी एकही दुकान उघडले नाही, चौका-चौकात अडवून चौकशी….

Spread the love

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी आता ऑड-इव्हन फार्मुला वापरण्यास सुरूवात केली आहे. ऑड दिवशी म्हणजेच रविवारी (दि.३) शहरात सकाळी ७ पासून  कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बंदच्या काळात एकही दुकान उघडले नसल्याने शहरवासीयांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी भटवंâती करावी लागली. दरम्यान, रविवारी शहराच्या विविध भागातील चौक पोलिसांनी बॅरीकेट लावून अडविले होते. चौकातून ये-जा करणा-या प्रत्येक वाहनधारकांची पोलिस कसून चौकशी करीत होते. विनाकारण फिरणा-या वाहनधारकांवर पोलिसांनी सक्तीने कारवाईचा बडगा उगारला होता.

गेल्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने धुमाकुळ घातला आहे. कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासमोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी ४ ते १७ मे च्या दरम्यान असणा-या लॉकडाऊनच्या तिस-या टप्यात ऑड-इव्हन हा फार्मुला अंमलात आणला आहे. जसे २,४,६,८,१०,१२,१४ व १६ मे रोजी जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील. तर विषम तारखांना म्हणजे ३,५,७,९,११,१३,१५ व १७ मे रोजी शहर पूर्णपणे लॉकडाऊन असेल. या दिवशी जिवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार आहेत. ऑड-इव्हन फार्मूला मधुन पोलिसांनी दवाखाने व मेडिकल या सेवांना सुट दिली आहे.

दरम्यान, विषम तारीख असलेल्या ३ मे रोजी शहरातील सर्वच व्यवहार सकाळपासूनच बंद होते. त्यामुळे एरव्ही बाजारात असणारी गर्दी तुरळक प्रमाणात दिसून येत होती. सकाळपासूनच एकही दुकान उघडले नसल्याने शहरवासीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी भटवंâती करावी लागली. रविवारी सकाळपासूनच पोलिसांनी विविध चौकात बॅरीकेट लावून रस्ते अडविले होते. चौकातून ये-जा करणा-या प्रत्येक वाहनधारकाची पोलिस कसून चौकशी करीत होते. विनाकारण फिरणा-या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!