Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusWorldUpdate : दुनिया : जाणून घ्या कुठल्या देशात किती रुग्ण ? गेल्या २४ तासात जगभरात ९८ हजार रुग्णांची वाढ , एकूण रुग्णांची संख्या ३४ लाखावर….

Spread the love

जगभरात 212 देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 39 हजार ६२२  पार पोहोचली आहे. मागील 24 तासांत ९८ हजार नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २,३९,६२२  इतका झाला आहे. वर्ल्डोमीटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत ३४ लाख ०२ हजार १५९लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. यांपैकी १०,८३, ९४१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतातील एकूण रुग्णांची संख्या ३७३३६ इतकी झाली असून मृत्यूची संख्या १२२३ तर डिस्चार्ज करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १०००७ इतकी झाली आहे. भारतातील मृत्यू दर दिवसेंदिवस कमी होत असून आता हा दर ११ टक्क्यांवर आला आहे.

जगभरातील ऍक्टिव्ह केसेस २०,७८,५९६ इतक्या असून त्यापैकी केवळ २ टक्के म्हणजेच ५१,३६६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, तर मृत्यूचा दार १८ टक्क्यांवर आहे. जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या एकूण आकड्यापैकी जवळपास एक तृतियांश रूग्ण अमेरिकेमध्ये आढळून आले आहेत. तर जवळपास एक चतुर्थांश मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेनंतर स्पेन कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेला दुसरा देश आहे. जिथे 24,824 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण 242988 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 28236 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 207,428 वर पोहोचली आहे. यानंतर फ्रान्स, जर्मनी, युके, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देशा जास्त प्रभावित झाले आहेत.

अमेरिका : एकूण 177,454 कोरोना बाधित, तर 27,510 जणांचा मृत्यू

फ्रान्स : एकूण 167,346 कोरोना बाधित, तर 24,594 जणांचा मृत्यू

जर्मनी : एकूण 164,077 कोरोना बाधित, तर 6,736 जणांचा मृत्यू

टर्की : एकूण 122,392 कोरोना बाधित, तर 3,258 जणांचा मृत्यू

रूस : एकूण 114,431 कोरोना बाधित, तर 1,169 जणांचा मृत्यू

इराण : एकूण 95,646 कोरोना बाधित, तर 6,091 जणांचा मृत्यू

ब्राझील : एकूण 92,109 कोरोना बाधित, तर 6,410 जणांचा मृत्यू

चीन : एकूण 82,874 कोरोना बाधित, तर 4,633 जणांचा मृत्यू

कॅनडा : एकूण 55,061 कोरोना बाधित, तर 3,391 जणांचा मृत्यू

बेल्जियम : एकूण 49,032 कोरोना बाधित, तर 7,703 जणांचा मृत्यू

रूस, टर्की, यूके, जर्मनी यांच्यासह आठ असे देश आहेत. जिथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या एक लाख पार पोहोचली आहे. पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन) असे आहेत, जिथे 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 61 हजार पार पोहोचला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!