Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusMaharashtraNewsUpdate : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येत हजाराच्या वाढ …औरंगाबाद २३९ वर !!

Spread the love

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मुंबई, पुणे, मालेगावनंतर आता औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. औरंगाबाद शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये अचानक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 62 रुग्ण आढळून आल्यानंतर  आज सकाळी आणखी 23 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 239 वर  पोहचली आहे. याशिवाय राज्यातील रुग्णांमध्ये एक हजाराची वाढ झाली आहे.

काल शुक्रवारी 1 मे रोजी दिवसभरात 32 नवीन रुग्ण आढळून आले होते. शहरात 13 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मात्र, पुढे संपुर्ण मार्च महिन्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाने शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मागील शनिवारपर्यंत शहरातील रुग्णांची संख्या 52 पर्यंत पोहचली होती. त्यानंतर आता या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसात ही संख्या दुप्पट होऊन बुधवारी रात्री 130 वर पोहचली. त्यानंतर गुरूवारी सकाळी 21 नवीन आणि सायंकाळी तब्बल 26 असे एकूण 47 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 177 झाली आहे. त्यात शुक्रवारी आणखी 32 रुग्णांची भर पडली आहे. आणी आज सकाळी आणखी 23 रुग्ण वाढले आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  239 वर पोहोचली आहे.  त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरातील काही परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.

औरंगाबाद प्रशासनाचा कडक निर्णय 

दरम्यान औरंगाबाद शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने  या पार्श्वभूमीवर प्रशासनाने  शहरात ऑड-ईवन (सम-विषम) फॉर्म्युला लागून करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली आहे. त्यांनी प्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ,  आवश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांची जास्त गर्दी होऊ नये, यासाठी शहरात उद्या 3 मेनंतर सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी जाहीर केलेल्या सम-विषम फॉर्म्युल्यानुसार 3, 5, 7, 9, 11, 13, 15,  17 मे या विषम तारखांना मात्र शहरातील सर्व दुकाने 24 तास बंद राहतील. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. औषधी दुकाने आणि दवाखान्यांना यातून सूट देण्यात आली आहे. तर 4,6,8,10,12,14,16 मे या सम तारखांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत  ४ तासात नागरिक आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घोषित केलेल्या वेळेत कोणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

मुंबईत मातोश्रीबाहेरील तीन पोलिसांना कोरोना 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री बाहेरील कलानगर मुख्य गेटवरील तीन पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या तीनही पोलिसांवर सध्या पुढील उपचार करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. मात्र खबरदारी म्हणून कला नगर परिसरातील सर्व पोलिसांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या आधी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सर्व पोलिसांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.  मुंबईत शुक्रवारी 751 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 7625 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी 5 मृत्यूंसह 295 मृत्यूसंख्या झाली आहे. मृतांमध्ये 3 पुरुष 2 महिलांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळले २४ रुग्ण 

नाशिक जिल्ह्यात करोनानं आपला विळखा घट्ट केला असून काल रात्रीपासून तब्बल २४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या ठिकाणीही काही रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहरातील विविध भागांत आठ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळं लॉडाऊनचे निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. शनिवारची सकाळ नाशिककरांसाठी चिंता  वाढविणारी ठरली आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास जिल्हा प्रशासनाला ६६ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये मालेगावातील २३ पैकी १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सात नवीन रुग्ण असून उपचार घेणाऱ्या पाच बाधित रुग्णांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे या रुग्णांना आणखी काही दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. नाशिक शहरातील अनेक भागात नव्याने बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. यामध्ये पाथर्डी फाटा, उत्तम नगर, पंचवटीतील हिरावाडी, देवळाली, सातपूर कॉलोनी येथील रुग्णांचा समावेश आहे. हा सर्व दाट लोकवस्तीचा परिसर असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.दरम्यान चांदवड तालुक्यातील देवरगाव येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. याशिवाय नांदगाव तालुक्यातकही करोना विषाणूने शिरकाव केला असून मनमाडला एक रुग्ण आढळला आहे. सिन्नर तालुक्यातही पुन्हा एक रुग्ण बाधित आढळला आहे. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटल येथे एका ५४ वर्षीय व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे.

नाशिकवरून दुसरी रेल्वेगाडी रवाना , भुजबळांनी दाखवला हिरवा झेंडा 

दरम्यान नाशिकमध्ये अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून लखनऊसाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आली असून १६ बोगी असलेल्या या विशेष गाडीतील प्रत्येक बोगीत ५४ लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  नाशिकरोड रेल्वे स्थानकावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी, सकाळी गावी जाण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व मजूर व कामगारांना विशेष बसनं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आणण्यात आलं. रेल्वे गाडी निर्जंतूक केल्यानंतर सर्व प्रवाशांना गाडीत बसवण्यात आलं. प्रवाशांना गाडीत बसवताना सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळं एका डब्यात ५४ प्रवाशांची व्यवस्था झाली आहे. आज एकूण ८४५ कामगार रवाना झाले. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४३ वर

जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथील ४२ वर्षीय पुरुष  व ५५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जलजिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४३ वर जाऊन पोहोचली आहे.

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयातील दोघांना लागण

शहरातील चिकलठाणा भागात व मसनतपूर भागातील दोघेही जिल्हा रुग्णालयात काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता करोनाची बाधा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही झाल्याचे पुढे आले आहे. भवानीनगर वॉर्डातील दत्तनगरमधील वाहनचालकासही करोनाची लागण झाल्याने या सर्वाच्या संपर्कातील ७० जणांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती कोविड कार्यबल गटाच्या प्रमुख अ‍ॅड. अपर्णा थिटे यांनी दिली. परभणी येथून गारखेडा भागात आलेल्या व्यक्तीस शोधण्याचा दूरध्वनी परभणी प्रशासनाकडून आल्यानंतर इंदिरानगर भागात तिचा शोध घेण्यात आला. मात्र, तिचा शोध लागला नाही. मात्र, तिच्या संपर्कातील पाच जणांचेही विलगीकरण करण्यात आले. दरम्यान करमाड येतील चारही महिलांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले असल्याने करमाडकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!