Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : बनावट सोने तारण प्रकरणात एका आरोपीला अटक आणि पोलीस कोठडी

Spread the love

औरंगाबाद : गोल्ड व्हॅल्युअरशी संगनमत करुन बनावट सोन्यावर चार लाख 82 हजार 800 रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणात आरोपी सोनु रामकुमार घुसर (33, रा. गांधीनगर, औरंगाबाद) याला 2 मे रोजी पहाटे पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, रविवारपर्यंत (दि. 3 मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वाडकर यांनी शनिवारी (दि. 1 मे) दिले. प्रकरणात यापूर्वी सोन्याचे मुल्यांकन करणारा आरोपी शरद शहाणे याला अटक करण्यात आली होती.
प्रकरणात जना स्मॉल फायनान्स बँकेच्या समर्थनगर शाखेचे शाखा अधिकारी अश्रफ आबेद शेख यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, बँकेत व्हॅल्युअर म्हणून काम करणारा आरोपी शरद जगनराव (जगन्नाथ) शहाणे (33, रा. न्यू बालाजीनगर, मोंढानाका) याच्याशी संगनमत करुन आरोपी सोनु घुसर याने बनावट सोने तारण ठेउन त्यावर चार लाख 82 हजार 800 रुपयांचे कर्ज घेतले तर आरोपी विष्णु हरिश्‍चंद्र हिंगे (19, रा. श्रेयनगर, देवानगरी) याने एक लाख 90 हजार 100 रुपयांचे कर्ज घेतले होते. दोघांनी बँकेला सहा लाख 72 हजार 900 रुपयांचा गंडा घातला.  दरम्यान बँकेने त्रयस्त व्हॅल्युअरकडून वरील दोघांनी तारण ठेवलेल्या सोन्याची पडताळणी केली असता, ते सोने बनावट असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी विष्णु हिंगे हे पसार आहे. तर आरोपी सोनु घुसर याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून रक्कम जप्त करणे तसेच आरोपीच्या साथीदारांचा शोध घेणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकिल सुर्यकांत सानेटक्के यांनी न्यायालयात केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!