Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MaharashtraCoronaUpdate : धक्कादायक : हिंगोलीतील आणखी २५ जवानांनाची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह

Spread the love

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतच असून हिंगोली येथील  राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) आणखी २५ जवानांना करोनाची लागण झाल्यानं चिंता वाढली आहे. आज सकाळी आलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता ४६ झाली आहे.

याविषयी प्रशासनाने दिलेलय माहितीनुसार हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील १९४ जवान व अधिकारी मुंबई व मालेगाव येथे बंदोबस्ताची ड्युटी संपवून १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात परत आले होते. त्यापैकी १५ जणांना करोनाची बाधा झाल्याचं उघड झालं आहे. तर, जालना येथील एक जवान गावाकडे परतल्यानंतर केलेल्या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जालन्याच्या जवानाच्या संपर्कातील इतर दोन व्यक्तींनाही करोनाची लागण झाली आहे. तर, वसमत व सेनगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्याची रुग्ण संख्या कालपर्यंत २१ होती. मात्र आज त्यात एकदम २५ जणांची भर पडली आहे.

दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयाला आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार २५ एसआरपीएफ जवान करोना बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची संख्या ४६ इतकी झाली असून एकानं करोनावर मात केल्यानं त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मालेगावहून आलेल्या ३३ तर मुंबईहून आलेल्या ८ जवानांना करोनाची लागण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील खासगी ट्रॅव्हल्सवरील चालक २३ एप्रिल रोजी पंजाब राज्यात भाविकांना सोडण्यासाठी गेला होता. २८ एप्रिल रोजी तो परत आला होता. या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर हिंगोलीच्या एका रुग्णावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!