Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : पंतप्रधान उद्या बोलणार , समजून घ्या काय होताहेत बदल ? रुग्णांची संख्या ३५ हजार पार…

Spread the love

देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे तो लक्षात घेता सरकारने पडलेल्या तीन झोनपैकी रेड झोन मध्ये लॉकडाऊन वाढणार याची मानसिक तयारी लोकांनी केलेली असतानाच आधी घोषित केलेला लॉकडाऊन संपायला आता फक्त दोन  दिवस राहिले आहेत. सुरुवातीला २१ दिवसांचा आणि नंतर वाढ करून पुन्हा १९ दिवसांचा लॉकडाऊन देशात लावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन आता ३ मे रोजी संपणार असला तरी  तो आणखी दोन आठवढे वाढविण्यात आल्याने आता लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.  त्यानंतर काय उपाययोजना कराव्यात यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली असून  या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशवासियांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. अर्थात नेहमीप्रमाणे ते काय बोलतील, कुठल्या घोषणा करतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं असणार हे मात्र नक्की. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची संख्या ३५,०४३ वर पोहचलीय. यातील ८८८९ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले तर ११४७ जणांनी आपले प्राण गमावले. सध्या देशात २५,००७ जणांवर उपचार सुरू आहेत

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढणार असल्याचं जाहीर केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत काढलेल्या पत्रकात हि माहिती देण्यात आली आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाने सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने Disaster Management Act 2005 नुसार हा लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे आता देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्याच बरोबर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठीही केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

नव्या गाईडलाईन्स काय आहेत ? 

केंद्र सरकारने घोषित केल्यानुसार कोरोनाच्या स्थितीवरून देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यातआलं आहे. या पैकी ग्रीन  झोनमधील आर्थिक घडामोडींना सूट देण्यात आली आली असून  ३ मेनंतर या देशातील ७३९ पैंकी ग्रीन झोनमध्ये असलेल्या ३१९ जिल्ह्यांमध्ये फॅक्टरी, दुकानं, छोटे-मोठे उद्योग यांसहीत ट्रान्सपोर्ट आणि इतर सेवा काही अटींसहीत उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या जिल्ह्यांत गेल्या २१ दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

ग्रीन झोन मध्ये काय सुरु होईल ?

गृह मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशानुसार, ग्रीन झोनमध्ये ३१९ जिल्ह्यांत बस सेवा सुरू केली जाऊ शकेल. परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही. त्यामुळे ५० आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत. या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणाऱ्या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळू शकेल. सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्टस कॉम्प्लेक्समात्र  बंदच राहतील.

ऑरेंज झोनमध्ये काय सुरु होईल ?

ऑरेंज झोनमध्ये बससेवा मात्र बंद राहतील. परंतु, कॅबला परवानगी देण्यात आली आहे. कॅबमध्ये ड्रायव्हरसोबत एकच प्रवासी प्रवास करू शकेल. ऑरेंज झोनमध्ये इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटिज सुरू होतील आणि कॉम्प्लेक्सही उघडले जातील.

रेड झोनला सूट नाही

रेड झोनला मात्र कोणताही सूट देण्यात आलेली नाही. न्हावी, सलून इत्यादीदेखील बंद असतील असे ठरवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर  संकटादरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. यानंतर सायंकाळी हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. या बैठकीत गृह मंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप पुरी आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत करोना लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची समिक्षा करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!