Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण

Spread the love

कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर पहिल्यांदाच यंदाचा महाराष्ट्र वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला.  उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज  सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत मर्यादित जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.जिल्ह्यात केवळ उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन ठिकाणीच ध्वजारोहण करण्याचे शासनाचे आदेश होते त्यानुसार हे कार्यक्रम पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण समारंभास उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदवले यांचीच उपस्थिती होती. तसेच बँड पथक आणि सलामी पथकात पाच पेक्षा कमी पोलिसांची उपस्थितीला परवानगी देण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!