Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusLatestUpdate : औरंगाबाद १४४ , राज्यातील रुग्णांची संख्या दहा हजाराच्या जवळ तर देशभरात एकूण रुग्ण ३३ हजार….

Spread the love

एक बातमी लोकांपर्यंत जात नाही तोच सकाळी ११ नंतर कडक १४४ कलमांतर्गत कडक कर्फ्यू  सुरु असलेल्या औरंगाबादमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा बदलत आहे . आताही हा आकडा १३० वरून बदलून १४४ वर गेली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. औरंगाबादमध्ये आज आणखी  १४ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या १४४ वर पोहोचली आहे. आज औरंगाबादच्या आसेफिया कॉलनी, जयभीम नगर, किलेअर्क, कैलासनगर, नूर कॉलनी, चिकलठाणा आदी भागात १४ नवीन करोनाबाधित सापडले आहेत. यात जयभीम नगरमध्ये सहा तर इतर ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान आजच्या  दिवशी राज्यभरात एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली  असून देशभरात एकूण रुग्ण संख्या ३३,०५० झाली आहे . तर  मृत्यूची संख्या १,०७४ इतकी झाली आहे.

औरंगाबाद शहरातील या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जयभीम नगर, किलेअर्क, नूर कॉलनी आणि चिकलठाण्यात करोना रुग्ण सापडत असल्याने हे परिसर करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे परिसर आधीच सील केले आहेत. मात्र, हे सर्व परिसर दाटीवाटीचे असल्याने या परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरची डोकेदुखी वाढली आहे.त्यामुळे झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या परिसरातील लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्याच्या हालचालीही प्रशासनाने सुरू केल्या आहेत. तसेच या परिसरात औषधांच्या फवारणीवरही भर देण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यातही  कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे काल राज्यात आज कोरोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा हजाराच्या जवळ पोहचली आहे. तर कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला होता तर आज ३२ रुग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे.  या परिस्थितीमध्येही दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून आज एकाच दिवसात २०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ५९३ रुग्णांनी करोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. हा आकडा वाढावा म्हणून आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.

चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील करोना मृत्यूदर सर्वाधिक आहे. राज्यात आज एकूण ३२ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात मुंबईतील २६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात तीन तर सोलापूर, औरंगाबाद आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला. एकूण मृतांपैकी २५ पुरुष आहेत तर ७ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण तर १५ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. ३२ पैकी १८ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कालच्या तुलनेत राज्यात करोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट पाहायला मिळाली. मंगळवारी राज्यात करोनाचे ७२९ नवीन रुग्ण आढळले होते. त्याजागी काल  करोनाचे ५९७ नवीन रुग्ण आढळले. हाच कायतो दिलासा म्हणता येईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!