Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadNewsUpdate : नांदेड गुरूद्वारा मंडळातील चौघांचे संचालकपद उच्च न्यायालयने केले बडतर्फ

Spread the love

राज्य शासनाने दिनांक 21/6/2019 परिपत्रक अधिसूचित करून नांदेड सिख गुरूद्वारा अधिनियम 1956 चे नियम 6 नुसार 4 सदस्य यांची संचालक मंडळात निवड केली होती. अधिसूचना ही हुजूरी खालसादिवाण यांच्या सदस्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणारी होती त्यामुळे हुजूरी खालसादिवाण यांचे सदस्य सरदार मंजीत सिंग यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे विधिज्ञ  गणेश गाढे यांचे मार्फत शासन निर्णयाविरुद्ध रिट याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेमध्ये कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आले होते की ज्या चार व्यक्तींची संचालकपदी नेमणूक झाली आहे त्यांची शिफारसी साठी हुजुरी खालसादिवाण च्या मंडळाने कोणताही अधिकृत ठराव पारित केला नव्हता.
हुजूरी खालसादिवाण च्या मंडळाने कोणाचेही नाव संचालकपदी शिफारस केले नव्हते मात्र सरदार गुरुबचनसिंग उत्तमसिंग घडीसाज यांनी त्यांचा राजकीय हस्तक्षेप वापरून स्वतःची व स्वतःच्या मुलाची नांदेड गुरुद्वारा संचालकपदी वर्णी लावून घेतली होती तसेच इतर दोन सदस्य सरदार जगवीरसिंग शाहू व सरदार शार्दुलसिंग फौजी. खोटे व बनावट कागदपत्राद्वारे सदरील चार व्यक्तींनी स्वतःची संचालकपदी वर्णी लावून घेतली होती. सदरील प्रकरणांमध्ये मध्ये दोन्हीही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर  दिनांक 30/ 4 /2019 रोजी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे द्विसदस्यीय न्यायमूर्ती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल घोषित केला. माननीय उच्च न्यायालयाने निकालाद्वारे सदरील चार संचालकांची नेमणूक नियमबाह्य ठरून ती रद्द केली आहे. याचिकाकर्ते मार्फत विधी तज्ञ गणेश गाढे यांनी बाजू मांडली तर शासनाची बाजू विधिज्ञ यावलकर यांनी मांडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!