Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BollywoodSadNews : प्रसिद्ध हरहुन्नरी अभिनेता इरफान खान अखेर काळाच्या पडद्याआड ….

Spread the love

बॉलिवूडमधील प्रसिद्ध हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. आज सकाळपासून इरफानच्या मृत्यूच्या अफवा पसरत होत्या मात्र इरफान यांच्या कुटुंबीयांनी पत्रक प्रसिद्ध करून “ते लढवय्ये असून लवकर बरे होतील ” अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं. दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचे  अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आले नाही याचे त्याला अतीव दुःख झाले होते.

गेल्या काही वर्षांपासून इरफान कर्करोगाने आजारी होता.  २०१७ मध्ये परदेशात जाऊन त्याने कर्करोगावर उपचार घेतला  होता. याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्यातून ते बरे झाल्यानंतर गेल्या वर्षी २०१९ मध्ये भारतात आल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. बॉलिवूड अभिनेता इरफान खान दीर्घ काळापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी झुंज देत होता. आज इरफानची प्रकृती अचानक बिघडल्याने  त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र इरफानच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आणि त्यातच त्याचे निधन झाले.

सकाळी जेंव्हा तो ह्यात असताना त्याच्या मृत्यूची अफवा पसरली तेंव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रक काढून त्या या पत्रकात म्हटले होते कि ,  इरफानबाबत अशा प्रकारच्या अफवा अत्यंत असंवेदनशील आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत अंदाज लावणं चूक आहे. आम्ही इरफानवर भरभरुन प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या लोकांप्रती आभारी आहोत. मात्र त्याच्या प्रकृतीविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा त्रासदायक आहेत. इरफान एक खंबीर व्यक्तीमत्व आहे आणि तो या आजाराचा सामना करत आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो की, अशा अफवा पसरवू नका. आम्ही आपल्याला इरफानच्या तब्येतीबाबत अपडेट देत राहू. आणि अखेर दुपारी १२.१५ च्या सुमारास इरफानच्या मृत्यूचे वृत्त आले.

इरफान खानने १६ मार्च २०१८ मध्ये आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. मला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचे समजले. सध्या तरी कठीण झाले आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावे लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो, असं इरफाननं म्हटलं होतं. त्यानंतर या आजारावर उपचार करण्यासाठी तो लंडनला गेला होता. दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला होता. आपल्या आजारातून सावरत ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे चित्रीकरणही केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!