Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadNewsUpdate : “या ” आरोपीमुळे आली पोलीस अधिकाऱ्यांसहित इतर पोलिसांवर घरी बसण्याची वेळ !!

Spread the love

औरंंंगाबाद शहरात  कोरोना विषाणूने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली असून कोरोना विषाणूमुळे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनाच  क्वारंटाईन करण्याची वेळ पोलिस प्रशासनावर बुधवारी (दि.२९) आली आहे. दोन दिवसापुर्वी सिटीचौक पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला असून कोरोनाबाधीत रूग्णाला पकडून आणलेल्या डीबी पथकातील कर्मचा-यासह वरिष्ठ अधिका-यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सिटीचौक पोलिसांनी गेल्या आठवड्यात २४ एप्रिल रोजी चेलिपूरा परिसरात नशेच्या गोळ्या विक्री करणा-या ४५ वर्षीय आरोपीला सिटीचौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली होती. या पथकात पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांच्यासह पाच ते सहा कर्मचा-यांचा समावेश होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची वरिष्ठ अधिकारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक सय्यद यांनी देखील चौकशी केली होती. अटक केलेल्या आरोपीची कोरोना टेस्ट करण्यासाठी त्याला घाटी रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी घाटीतील डॉक्टरांनी आरोपीला कोरोना वॉर्डात दाखल करून घेतले होते.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सिटीचौक पोलिस ठाण्याचे डीबी पथकाचे उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांच्यासह जवळपास ३० कर्मचा-यांना क्वारंटाईन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!