Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaUpdateAurangabad : औरंगाबादेत 23 कोरोनाबाधितांची वाढ, रुग्णसंख्या १०५ वर , संशयित मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून  त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची संख्या सायंकाळी १०५  झालेली आहे. ज्यामध्ये मिनी घाटीत ६८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, जलाल कॉलनीतील अन्य एक जुने ७५ वर्षीय पुरूष जुने रुग्ण, असे एकूण ६९  कोरोनाबाधित रुग्ण, घाटीतील सात रुग्ण असे एकूण ७६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आजच्या मृत रुग्णासह आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या  मृतांचा आकडा ७ झाला आहे तर  23 रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

मिनी घाटीत आज दाखल झालेले रुग्ण किले अर्क, असेफिया कॉलनी, भीमनगर, संजयनगर मुकुंदवाडी, पैठण गेट, बडिया तकिया मस्जिद, सिल्लेखाना, दौलताबाद या परिसरातील आहेत. यामधील संजय नगर येथील ६० वर्षीय महिला रुग्णास घाटी येथे संदर्भीत करण्यात आलेले आहे. आज घाटीत एकूण ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये ३७ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. दरम्यान ७९ जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. ३८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. ४० जणांचे येणे बाकी आहेत, असे मिनी घाटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

घाटीत मृत संशयित महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांवर उपचार सुरू

घाटीत २८ रोजी रात्री १.२० मिनिटांनी किलेअर्क येथील ७७  वर्षीय महिला रुग्णाला  मृतावस्थेत दाखल करण्यात आले .  घरीच चक्कर येऊन  ७.३०  वाजता सदर महिला पडली होती.  या महिलेला पूर्वीपासून मधुमेह आणि  मानसिक आजार होता. हा रुग्ण दाखल झाल्यानंतर अपघात विभागात त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.
घाटीत २८ रोजी दुपारी चार वाजेपर्यंत एकूण ३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. नऊ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. पाच जणांचे अहवाल येणे बाकी आहे. घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात ३२ रूग्ण भरती आहेत. तर आज संजय नगर, मुकुंदवाडी येथील ६० वर्षीय महिला रुग्णास घाटीमध्ये संदर्भीत करण्यात आल्याने घाटीच्या रुग्णालयात सात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील चोविस तासात दोन कोविड निगेटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दोन कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे, असेही डॉ. येळीकर यांनी कळवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!