Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewUpdate : औरंगाबाद महानगरपालिका अखेर बरखास्त, प्रशासकपदी आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती

Spread the love

औरंगाबाद महानगरपालिकेची मुदत आज संपत असल्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आज 28 एप्रिल रोजी एका आदेशान्वये औरंगाबाद महापालिका बरखास्त करून महापालिकेच्या प्रशासकपदी अस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती  करण्यात आले आहे. राज्याच्या नगर विकास खात्याने जरी केलेल्या शासन  आदेशात म्हटले आहे की,  संपूर्ण जगभर पसरलेल्या कोविड-१९  या साथीच्या रोगांमुळे राज्यातील सर्व निवडणुका केल्या होत्या.  आता राज्य निवडणूक आयोगाने सदर निवडणुका संबंधित स्थानिक संस्थांच्या मुदत संपण्यापूर्वी घेणे शक्य नसल्याचे कळविले आहे त्यानुसार भारतीय संविधानातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षाची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही.  त्यानुसार महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषतः कलम 452 मधील तरतुदीनुसार दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी मुदत संपत असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रशासक पदी अस्तिक कुमार पांडे आयुक्त औरंगाबाद महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे.  त्यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारुन अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची ही या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार प्रधान सचिव नगर विकास यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत एकोणावीस च्या संक्रमणामुळे उद्भवलेली आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती लोकांचा सहभाग विचारात घेता संबंधित प्रशासकांना व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनोपचारिक रित्या शक्‍यतोवर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती,  विरोधीप क्षनेते,  विषय समित्यांचे सभापती व गटनेते यांच्याशी सल्लामसलत करावी.

या आदेशात शेवटी म्हटले आहे की,  महानगरपालिकेचे कामकाज सुयोग्य व लोकाभिमुख व्हावे या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी वरीलप्रमाणे अनौपचारिक सल्लागार समिती असावी तसेच करण्यात येत असणाऱ्या उपाययोजना वेळोवेळी आवश्यकतेनुसार उपरोक्त पदाधिकाऱ्यांना अवगत कराव्यात कोविड-१९ च्या नियंत्रणाच्या दृष्टीने संबंधित पदाधिकाऱ्यांकडून सूचना मिळण्याच्या दृष्टीने शक्यतोवर प्रत्येक पंधरा दिवसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी सदर बैठक व्हिडीओ कॉन्फरन्स व अन्य ऑनलाईन सिस्टीम द्वारे घेण्याबाबत प्रयत्न करावेत बैठकीच्या वेळी तसेच आरोग्यविषयक सर्व दक्षता व सोशल डिस्टन्स इन बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!