Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusLatestUpdates : मुंबईत कोरोनामुळे पोलिसांचा तिसरा बळी , जाणून घ्या २४ तासातील कोरोनाग्रस्तांची संख्या, बरे झालेले रुग्ण आणि मृत्यू

Spread the love

देशातली करोना रुग्णांची संख्या २८, ३८० पर्यंत पोहोचली. तर करोनाच्या एकूण ८८६ जणांचा मृत्यू झाला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

कर्नाटकमध्ये गेल्या २४ तासांत ९ नवीन करोना रुग्ण आढळले. देशात करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर २२ टक्क्यांवर, गेल्या २४ तासांमध्ये ३८१ रुग्ण झाले बरे- लव अग्रवाल, संयुक्त सचिव, केंद्रीय आरोग्य मंत्रालय.

नवी दिल्ली: ३ मे नंतरच लॉकडाउनवर निर्णय घेणार, अर्थव्यवस्थेबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, आमची अर्थव्यवस्था चांगली- पंतप्रधान मोदी.

मुंबईत पोलिसांचा तिसरा मृत्यू 

मुंबई पोलीस दलात आपले कर्तव्य बजावणाऱ्या आणखी एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलातील हा तिसरा करोना बळी आहे. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका ५६ वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. कुर्ला वाहतूक विभागात ते कार्यरत होते. मुंबई पोलीस विभागानं याबाबत माहिती दिली. याआधी मुंबई पोलीस दलातील दोन पोलिसांचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला होता. मुंबई पोलीस दलातील हा तिसरा बळी आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी नारायण सोनावणे असे त्याचे नाव आहे.

 

 

उत्तर प्रदेशात करोनाचे रुग्ण वाढले. रुग्णसंख्या १९५५ तर आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू , राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती

रुग्णांवर मोफत उपचार 

दरम्यान राज्यातील सरकारी रुग्णालये तसेच महानगरपालिकांच्या रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर होत असलेल्या चाचण्या, उपचार, जेवण या सर्व सुविधा मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. झूम अॅपच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते, ते पुढे म्हणाले की, कोविड-१९ च्या संकटाची चाहुल लागताच राज्य सरकारने तातडीने पावले उचलली असून वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेली सर्व महाविद्यालये व रुग्णालये यांचे महाराष्ट्रभर जे जाळे आहे त्यामाध्यमातून तत्परतेने काम सुरू केले. राज्यात फक्त चार टेस्ट लॅब होत्या त्यांची संख्या वाढवून आज सरकारी तसेच खासगी अशा ४० लॅब कार्यान्वित आहेत आणि त्यात वाढ करून ६० पर्यंत केल्या जातील. या ४० लॅबमधून दररोज ७ हजार चाचण्या केल्या जात आहेत. यातूनच आजपर्यंत महाराष्ट्राने सर्वात जास्त एक लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. चाचण्याची संख्या वाढत आहे परंतु त्यासाठी आणखी जास्त प्रमाणात टेस्ट कीटची गरज आहे ती केंद्र सरकारने दिली पाहिजेत. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, यवतमाळ, सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये आवश्यक त्या सर्व यंत्रसामुग्रीसह सक्षम करून कोविड-१९ चा लढा देण्यासाठी सज्ज केलेली आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

पुण्यात कोरोनाचा वेग वाढला 

देशात २३ चाचण्यांमधून कोरोनाचा सरासरी एक रुग्ण आढळत असताना पुण्यात मात्र नऊ चाचण्यांवर कोरोनाचा एक रुग्ण आढळून येत आहे. पुण्यात रुग्णवाढ दुप्पट होण्याचा वेग हा ७ दिवसांचा आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची लवकरात लवरक माहिती घेऊन त्यांच्या चाचण केल्या पाहिजेत. अधिकाधिक चाचण्या केल्या पाहिजेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे, अशा उपाययोजना केंद्रीय पथकाने (IMCT) सुचवल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने आज दिली.  पुण्यात ससून रुग्णालयात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ८४ पर्यंत पोहोचली आहे. तर रुग्णांची संख्या ही १३१९ वर पोहोचली. पुणे शहर, जिल्ह्यात ५५ रुग्णांची वाढ झाली आहे.

मुंबईतील एकदा वाढला , ६ वॉर्डात अडीच हजार रुग्ण 

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजाराच्यावर गेला आहे. तर मुंबईतील ६ वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या सहाच्या सहा वॉर्डातील कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येकी ६०० वर गेली आहे. या सहाही वॉर्डातील रुग्णांची एकूण संख्या २५१८ आहे. म्हणजे मुंबईतील निम्मी रुग्णसंख्या या सहा वॉर्डात असल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!