Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CrimeUpdate : लॉकडाऊनमध्ये मनोरुग्ण झालेल्या मुलाने केला बापाचा खून , राग इतका अनावर झाला कि , तोडले गुप्तांग….

Spread the love

नागपुरात जीम प्रशिक्षक असलेल्या एका व्यसनाधीन तरुणाने  इंजेक्शन आणि स्टेरॉइड पावडर न मिळाल्याने मुलाने चाकूने वडिलांचा गळा कापून खून केला. इतकेच नव्हे तर, त्याने दाताने वडिलांचे गुप्तांगही तोडले. ही थरारक घटना हुडकेश्वरमधील नंदलाल चौकातील विघ्नहर्ता कॉलनी येथे शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन, आरोपीला अटक केली आहे. विजय पिल्लेवार (वय ५६) असे मृताचे, तर रोहित ऊर्फ विक्रांत पिल्लेवार (२८) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत याची जीम असून, तो प्रशिक्षकही आहे. त्याला स्टेरॉइडचे इंजेक्शन व पावडर घेण्याची सवय आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून जीम बंद आहे. त्याला पावडरही मिळाली नाही. याचा त्याच्या मनावर विपरित परिणाम झाला. तो मनोरुग्णासारखा वागू लागला. शनिवारी सकाळी त्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. विजय यांनी विक्रांत याच्या मित्रांना घरी बोलावलं. त्यानंतर विक्रांत याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केला. दोन तासानंतर घरी परत पाठविले. रात्री ११ वाजताच्या सुमारास विक्रांत हा आरडाओरडा करायला लागला. त्याने भिंतीला लाथाबुक्क्या मारायला सुरुवात केली. शेजाऱ्यांना शिवीगाळ करायला लागला. विजय यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विक्रांत याने वडिलांनाच मारहाण करायला सुरुवात केली. स्वयंपाक घरातील चाकूने विक्रांत याने वडील विजय यांचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात ते खाली पडले. त्यानंतर विक्रांत याने दाताने विजय यांचे गुप्तांग तोडले व ते बाजूला फेकले. याच दरम्यान विक्रांत याची आई व बहीण अवंती यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. विक्रांत याचा संताप बघून पोलिसांनी अतिरिक्त ताफा बोलावला. त्यानंतर पोलिसांनी विक्रांत याला पकडले. दोरीने त्याचे हात बांधून पोलीस ठाण्यात आणले. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन, विक्रांत याला अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!