Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रमजान मुबारक

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आणि मुस्लीम समुदायाला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच यावेळी पंतप्रधानांनी कोविड-१९ विरुद्ध लढाई विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. ‘रमजान मुबारक! मी सगळ्यांच्याच सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. हा पवित्र महिना दयाभाव, सुसंवाद आणि करुणेच्या प्रचाराचा ठरवा. कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत आपल्याला विजय मिळो आणि एक आरोग्यदायी विश्व निर्माण होवो’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झालीय. देशातील अनेक भागांत मुस्लीम बांधव शनिवारपासून रोजा पाळायला सुरुवात करतील. याच दरम्यान, अनेक नेत्यांनीही मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील कोरोनाचे आलेले संकट लक्षात घेता सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात सुद्धा नमाज अदा करताना सामाजिक अंतर पाळावे मशिदीत किंवा मोकळ्या मैदानात नमाज आदा करणे टाळावे असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री अब्बास नक्वी , एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!