Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : देशभरातील दुकानदार आणि व्यावसायिकांसाठीचा नेमका केंद्र सरकारचा आदेश काय आहे ?

Spread the love

केंद्रीय गृहमंत्रालयाने  आज शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली होती. परंतु कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शनिवारी सकाळी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. परंतु कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. तसंच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकाने  आणि रेसिंडेन्सिअल कॉप्लेक्समधील दुकाने  उघडण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे  केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले  आहे. तर बाजारपेठांमधील दुकाने  मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसंच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकांनांनाच सूट देण्यात आली आहे.

दारू विक्रीला परवानगी नाही…

दरम्यान याव्यतिरिक्त ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तूं पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसंच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच काम करणाऱ्यांना मास्क घालणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

देशभरात ३  मेपर्यंत लॉकडाऊन असला तरी  प्रत्येक राज्याने आपली बिघडलेली आर्थिक घडी आणि लोकांची गरज लक्षात घेऊन  २० एप्रिलनंतर काही नियम शिथिल केले होते. दरम्यान केंद्र सरकारने आज दि.२५  एप्रिलपासून देशभरातील दुकाने  उघडण्यास परवानगी दिली आहे. याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार काही नियमावली घालून देण्यात आली आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार २० एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे दुकानं बंद होती. दुकानं उघडण्यासाठी सरकारनं परवानगी दिल्यामुळे देशभरातील लाखो दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. गृहमंत्रालयाने  काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. या दुकानांची सरकारकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. हा नियम हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांना आणि जिल्ह्यांना लागू होणार नाही. तिथे लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळले जाणार आहे. तर मोठे शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स उघडण्यावर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.

दरम्यान केंद्र सरकारने  जारी केलेल्या आदेशानुसार काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दुकानांनमध्ये केवळ ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतात. दुकानदारांनी मास्क आणि हॅण्डग्लोज वापरायला हवेत. यासोबत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या आदेशामध्ये हॉटस्पॉमधील दुकानं, मॉल्ससाठी हा आदेश लागू होणार नाही असाही सांगण्यात आलं आहे. याबाबत राज्य सरकारकडूनही खुलासा येण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!