Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : कायदा करूनही फरक पडेना , पुन्हा एका महिला डॉक्टरला भावाच्या घरात येण्यास सोसायटीचा मज्जाव….

Spread the love

चेन्नईत डॉक्टरच्या मृत्यूनंतर अंत्यसंसकारासाठी त्यांचे पार्थिव घेऊन स्मशानभूमीत येणाऱ्या अँब्युलन्सवर हल्ला करण्याच्या घटनेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील डॉक्टरांना दिली जाणारी अनादराची वागणूक , त्यांच्यावरील होणारे हल्ले लक्षात घेऊन एक दिवसीय आंदोलनाचा इशारा दिला होता . त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी अशा लोकांवर कडक कारवाईसाठी नवीन कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते . तरीही डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीत फरक पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. हैदराबाद येथे असाच एक प्रकार घडला असून या प्रकरणात पोलिसांनी एका रेसिडेन्शियल अपार्टमेंट सोसायटीमधील काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिला डॉक्टरला बिल्डिंगमध्ये येण्यापासून रोखल्याचा आरोप या लोकांवर ठेवण्यात आला आहे. संबंधित महिला डॉक्टर हैदराबादमधील कोविड 19 रुग्णालयात कार्यरत आहे.

हा प्रकार आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी तेलंगणाचे आरोग्यमंत्री ई राजेंद्र यांच्यासमोर मांडल्यानंतर पोलिसांनी भादवि कलम १८८ , ३४१, ५०९ आणि ५०६ अंतर्गत संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर महिला डॉक्टरने वनस्थलीपुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसात दिलेल्या तक्रारीत महिला डॉक्टरने  म्हटले आहे की, बुधवारी अपार्टमेंट रेसिडेंट असोसिएशनच्या लोकांनी तिच्यासोबत बेशिस्त वर्तन केले . त्याशिवाय अपशब्दही वापरले आणि बिल्डिंगमध्ये प्रवेशही दिला नाही. महिला ऑर्थोपेडिक सर्जन असून बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्यांच्या भावाकडे निघाल्या होत्या. सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असताना सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे बिल्डिंगमध्ये आलेल्या महिला डॉक्टरला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याची  माहिती पोलिसांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!