Aurangabad Crime : कपड्याचे दुकान फोडणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : बीडबायपास रोडवरील एमआयटी चौकात असलेले कपड्याचे दुकान फोडून जवळपास ४० हजार रूपये किमतीचे कपडे चोरी करणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या टोळीला सातारा पोलिसांनी अवघ्या चार तासात ताब्यात घेतले. टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी ४० हजार रूपये विंâमतीचे चोरीला गेलेले कपडे जप्त केले आहेत.
बीडबायपास रोडवरील एमआयटी चौकात माणिकचंद माधवलाल पोखर्णा (वय ५५) यांच्या मालकीचे शांतीदुत नावाचे शाळेच्या मुलांचे कपडे विक्री करण्याचे दुकान आहे. चोरट्यांनी २५ एप्रिलच्या पहाटे दुकानाचे शटर उचकटून दुकानातून जवळपास ४० हजार रूपये किमतीच्या जिन्स पॅन्ट, शाळेच्या बॅग चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना उस्मानपुरा परिसरातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान चौघांनी दुकान फोडल्याची कबूली देत चोरी केलेला मुद्देमाल काढुन दिला.
ही कारवाई उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक आयुक्त रविंद साळोंखे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेदं्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम वडणे, सहाय्यक फौजदार मच्छिंद्र ससाणे, जमादार वैष्णव, कैसर पटेल, प्रदीप ससाणे, लांडे पाटील, कपील खिल्लारे आदींच्या पथकाने हा तपास करून मुद्देमाल हस्तगत केला.