Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कोविड -१९ च्या चाचण्यांसाठी मोबाईल लॅबचे उदघाटन , चाचणीचा वेग वाढणार…

Spread the love

देशभरात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी  मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच्या वतीने Covid-19 शी संबंधित संशोधन आणि चाचण्या वेगाने करणे शक्य होणार असून  संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओ, हैदराबादस्थित एक हॉस्पिटल आणि खासगी उद्योगाने मिळून ही MVRDL लॅब विकसित केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी या प्रयोगशाळेचे उदघाटन केले.

या बाबत शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करोना व्हायरसविरोधात अनेक सरकारी संस्था आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. DRDO अशाच संस्थांपैकी एक आहे. व्हेंटिलेटर, पीपीई किटसह करोनावर उपचारासाठी आवश्यक ठरणाऱ्या उपकरणांची निर्मिती डीआरडीओने केली आहे. डीआरडीओने बायोसेफ्टी लेव्हल २ आणि ३ ही प्रयोगशाळा विक्रमी १५ दिवसांमध्ये उभी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अशी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे सहा महिने लागतात.

“करोना व्हायरसच्या चाचणीचे दिवसाला १ हजार नमुने तपासण्याची या लॅबची क्षमता आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही लॅब उभी करण्यात आली आहे” असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!