Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : नांदेड जिल्ह्यात कोरोनाची एंट्री … नंदुरबार जिल्ह्यात तीन नवे रुग्ण

Spread the love

राज्यातील नांदेड शहरात करोनाचा एकही रुग्ण नसल्यामुळे  ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातही करोनाने प्रवेश केले असल्याचे वृत्त आहे . पिरपुराण भागातील ६४ वर्षीय इसम करोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं सकाळ पासूनच तो भाग सील करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नंदुरबारमधील नव्या रुग्णांमध्ये शहादा शहरातील दोघांचा तर, अक्कलकुवामधील एकाचा समावेश असल्याने नंदुरबारजिल्ह्यातील रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली

केंद्र आणि राज्य सरकारने  लॉकडाउन घोषित केल्यासपासून नांदेड जिल्हा प्रशासनाकडून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात होती. त्यामुळं करोनाला अटकाव करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले होते. त्यामुळं करोनाच्या दृष्टीनं राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या विभागणीमध्ये नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये समाविष्ट झाला होता. त्यानंतर प्रशासनानं काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांच्या आतच एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने मंगळवारी नऊ जणांचे नमुने तपासणीला पाठविले होते. यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याबद्दल समजताच प्रशासनानं रुग्णाचं वास्तव्य असलेला परिसर ताब्यात घेतला असून अन्य उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे.

दि. २१ एप्रिल रोजी तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 नमुने निगेटीव्ह आले असून 66 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी होते. नांदेड जिल्ह्यात काल पर्यंत कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने दिलासादायक परिस्थिती होती. काल पाठवलेले 66 संशयिताचे तपासणी अहवालातील उर्वरित 9 लोकांपैकी 8 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते तसेच 1 संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले होते.

मंगळवारी रात्री नांदेड जिल्ह्यातून 8 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर सिल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!