Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate Aurangabad : अखेर तो वाहनचालक जिन्सी पोलिसांनी शोधलाच…

Spread the love

औरंगाबाद – मुंबईहून शहरातील बायजीपुर्‍यात तीन कोरोना रुग्णांना आणून सोडणाऱ्या खासगी ऍम्ब्युलन्स  वाहनचालकाचा अखेर जिन्सी पोलिसांनी शोध लावला असून त्याच्याशी बोलणेही झाले आहे. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा वाहनचालक शोधण्याचे आदेश पोलिस आणि जिल्हाधिकार्‍यांना दिले होते.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सलीम असद अन्सारी (४४) रा. कल्याण असे चालकाचे नाव असून त्याचे सी.डी.आर. काढून त्याच्यासोबंत जिन्सी पोलिसांनी व्हिडीओ काॅलवर संपर्क केला. त्याला विश्वासात  घेत. त्याच्याकडून एक गरोदर महिला आणि दोन मुले ९ तारखेला शहरात आले होते. मुंबईहून शहरात कोरोना रुग्णांची अशी वाहतूक लाॅकडाऊन सुरु असतांना,पोलिस बंदोबस्त असतांना कशी होते. याची जबाबदारी कोणाची असा कडक सवाल गृहमंत्री देशमुख यांनी उपस्थित केल्यावर जिल्हा प्रशासनासहित पोलिसही त्या वाहनचालकाचा युध्द पातळीवर शोध घेत होते. आता उद्या पोलिसआयुक्तांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होईल असे वरिष्ठ सुत्रानी सांगितले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पीएसआय दत्ता शेळके आणि कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नाांमुळे पारपाडल्याचे सूत्रांनी सांगितले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!