Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : अंत्यसंसकारानंतर समजले ” त्या ” महिलेला होता “कोरोना ” चिंता वाढल्या…

Spread the love

औरंगाबादमधील एका ७६ वर्षीय महिलेचा  आणि एका ६० वर्षीय इसमाचा करोनामुळे  मृत्यू झाल्यामुळे  औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या आता ५ झाली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू  झालेली महिला कोरोना बाधित असल्याचे  स्पष्ट नसल्यानं तिच्या अंत्यसंस्काराला १०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती.  दरम्यान तिचा प्रथम अहवाल निगटीव्ह तर मृत्यूपूर्वीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता परंतु प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कारासाठी कुठलीही खबरदारी घेण्यात आली नसल्याने प्रशासनाची आणि अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांची चिंता वाढली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी कि , संबंधित महिला ही मुबई येथून शहरात परतली होती. रोजी ताप व दम्याच्या आजाराने बेशुद्ध पडल्याने  तिला घाटीच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले  होते . उपचारासाठी दाखल केल्यानंतर अपघात विभागातच तिला ऑक्सिजन लावून तिच्या लक्षणांवरून पुढील उपचारासाठी तिला कोव्हिड इमारतीच्या आयसीयूमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. त्याच दिवशी तिचा स्वॅबचा  नमुना घेण्यात आला मात्र तिचा तो  निगेटिव्ह आला होता.

दरम्यान महिला वृद्ध असल्यामुळे प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. या वृद्धेवर कोव्हिड संशयित म्हणून उपचार देखील सुरू केलेले होते. दक्षता म्हणून त्या महिलेच्या  लाळेचा नमुना डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविला. तो रिपोर्ट येण्याआधीच मंगळवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूच्या वेळी ती महिला करोनाबाधित असल्याचे  स्पष्ट नसल्याने नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार देखील केले. मंगळवारी रात्री उशिरा त्या महिलेचा दुसरा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असे  घाटीच्या औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितलं. आहे. बायलॅटरल न्युमोनिया विथ हायपरटेन्शन व ॲक्युट रेस्पिरिट्री डिस्ट्रेस सिंड्रोमने तिचा मृत्यू झाला, असे  रुग्णालय प्रशासनाने  सांगितले. त्यामुळे प्रशासन , त्या महिलेवर अंत्यसंस्कार करणारे नागरिक , तिचे नातेवाईक यांची चिंता वाढली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!