Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : चर्चेतली बातमी : कोरोना अखेर आला कुठून ? जाणून घ्या….

Spread the love

कोरोनाव्हायरसवरून अमेरिका आणि चीन यांच्यात प्रचंड वाद चालू असतानाच हा व्हायरस नेमका आला तरी कुठून, हा प्रश्नआता जगभर चर्चिला जात आहे . या वादात जे लोक अमेरिकेच्या बाजूचे आहेत त्यांना अमेरिकेचे तर जे लोक चीनच्या बाजूचे आहेत त्यांना चीनचे म्हणणे खरे वाटत असतानाच , सुरुवातीला साप, त्यानंतर वटवाघूळ (bats) आणि आता लॅबमधूनच (lab) हा व्हायरस पसरवण्यात आला असे  म्हटले  जातं असताना  मात्र हा व्हायरस लॅबमधून नव्हे तर एखादा प्राणी विशेषत: वटवाघळामार्फत पसरला असावा, असे जागतिक आरोग्य संघटनेने  (World Health Organisation)  म्हटल्याने पुन्हा एकदा या विषयावर अमेरिका आपली तीव्र प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.

या विषयावरून या आधीही WHO ने आपली प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेनं लॅबमधून कोरोनाव्हायरस पसरला असण्याची शक्यता नाकारली आहे. सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार कोरोनाव्हायरस हा प्राण्यापासून पसरला असे  दिसून येतं आहे. कोरोनाव्हायरस हा कोणत्या लॅबमध्ये तयार करण्यात आलेला नाही, असंही WHO नं म्हटलं आहे. दरम्यान  डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे क्षेत्रीय संचालक तकेशी केसाई यांनी सांगितलं की, “कोरोनाव्हायरस नेमका कुणामार्फत पसरला, हे ठोस सांगता येईल अशी माहिती सध्या तरी मिळणं शक्य नाही.  मात्र हा प्राण्यामार्फत माणसांमध्ये आल्याची शक्यता आहे” कोरोनाव्हायरस हा चीनमधील वुहानमध्ये असलेल्या लॅबमधून पसरला की नाही, याचा तपास करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं अशी प्रतिक्रिया दिली आहे. याच विषयावरून ट्रम्प यांनी WHO चा निधीही कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यावरून हा वाद आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!