Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : टाळ्या -थाळ्या वाजवूनही वाढत्या अनादरामुळे देशातील डॉक्टर्स दुखावले , २३ एप्रिलला पाळणार काळा दिवस …

Spread the love

कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही भाईचारा , बंधुभाव , राष्ट्रीय एकतेच्या गप्पा मारल्या, या महत्वाच्या कार्यात जीव धोक्यात घालून २४ तास रुग्णांची सेवा निर्णय डॉक्टरांचा, आरोग्य कर्मचाऱ्यांचा , पोलिसांचा कितीही सन्मान करण्यास सांगितले , त्यांचा सन्मान त्यासाठी कितीही टाळ्या-थाळ्या वाजवायला , दिवा-मेणबत्ती लावायला सांगितलं तरी याला महानाट्याशिवाय काहीही म्हणता येणार नाही . कारण कोरोनाच्या पार्शवभूमीवर ज्या पद्धतीने लोक डॉक्टरांना , पोलिसांना , आरोग्य कर्मचाऱ्यांना, पोलिसांना, कोरोनाच्या रुग्णांना , त्यांच्या नातेवाईकांना ज्या प्रमाणे वागणूक देत आहेत त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला लोकांनी कितीही प्रतिसाद दिल्याचे वरकरणी दिसले असले तरी प्रत्यक्षात डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबताना दिसत नाहीत.

आज तर चेन्नईत  कोरोनामुळे मृत झालेल्या डॉक्टरचे शव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरही  त्या भागातील नागरिकांनी हल्ला केला. डॉक्टरांवरचे हे हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढावा अन्यथा  २३ एप्रिलला काळा दिवस पाळण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. हा काळा दिवस पाळण्याच्या एक दिवस आधी सरकारला व्हाईट अलर्ट देण्याचंही नियोजन इंडियन मेडिकल असोसिएशनने केलं आहे. बुधवारी म्हणजे २२ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्व डॉक्टरांनी आपले पांढरे कोट परिधान करत मेणबत्ती पेटवून शांततेत या हल्ल्यांचा निषेध करावा असे  आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने म्हटले आहे कि , कोरोनाच्या या गंभीर संकटातही डॉक्टरांचा अनादर करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. काही ठिकाणी त्यांना त्यांच्या घरी येण्यास सोसायटीकडून मज्जाव करण्यात येत आहे, कुठे अपमानास्पद वागणूक मिळत आहे, तर कुठे मारहाणही करण्यात येत आहे . समाजासाठी जीव धोक्यात घालून काम करावं तर ही अवस्था.परवा तर चेन्नईमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीलाही लोकांनी विरोध केला. अॅम्ब्युलन्सवर दगडफेक केली. मृत्यूमध्येही आम्हाला सन्मान नाकारला जातोय अशा कडक शब्दांत नाराजी व्यक्त डॉक्टरांनी या पत्रात सरकार निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दरम्यान इंदूरमध्ये पंधरा दिवसांपूर्वींची  कोरोनाची टेस्ट करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना असा हल्ला सहन करावा लागला. मुंबईतल्या नर्सेसनी सोसायटीत नीट वागणूक देत नसल्याची तकार केली. चेन्नईप्रमाणेच आंध्र प्रदेशातही काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला, निदर्शनं झाली. कोरोनाची ही लढाई अजूनही संपलेली नाही. आता कुठे हे युद्ध सुरु झालं आहे. देशात अनेक ठिकाणी आरोग्य सेवेच्या बेसिक गरजांचीही पूर्तता नाही. अशा स्थितीत हे डॉक्टर काम करत आहेत. पण या सैनिकांचं मनोबल खच्ची करण्याचं काम समाजच करत असेल तर त्याला काय म्हणणार.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!