Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaUpdateAurangabad : औरंगाबाद शहरात पुन्हा तीन दिवस दुपारी १ ते रात्री ११ पर्यंत कडक कर्फ्यूचे आदेश

Spread the love
crpc144(1)(3)adesh dt.22 to 24 april

औरंगाबाद शहरात दि. 22  आणि  दि. 24 रोजी  पुन्हा कडक कर्फ्यू चे आदेश देण्यात आले असून या आदेशानुसार दुपारी एक  ते रात्री अकरा पर्यंत राहील कर्फ्यू राहील असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कळविले आहे.

औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) प्रमाणे शहरातील नागरिकांना मनाई आदेश दिला आहे. या आदेशात पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे की औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या वैद्यकीय व तत्सम अत्यावश्यक सेवा आस्थापना शेतकरी व दुग्ध उत्पादक यांना त्यांचे दैनंदिन कामाबाबत परवानगी देण्यात आलेल्या औद्योगिक आस्थापना व त्यांचे कामगार राज्य व केंद्र शासनाचे कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी यांना वगळता सर्व प्रकारच्या अस्थापना बंद राहतील सदर चा आदेश दिनांक २२ एप्रिल २०२० ते २४ एप्रिल रोजी दररोज दुपारी दीड ते रात्री अकरा वाजेच्या दरम्यान लागू करीत आहे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध साथरोग अधिनियम कायदा 2005 व भारतीय दंडविधान प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!