Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Aurangabad News Update : शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित धान्य वाटप करण्याचे  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण 1802 स्वस्त धान्य दुकाने  असून  त्यापैकी 199 दुकाने ही औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत.  प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर एका शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश काढून त्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धान्य वाटप करावे .यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी कृषी सहायक आणि मंडळाधिकारी यांचा यात समावेश करावा.सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचावे, आणि कोणीही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये अशा सूचना आणि आदेश  औरंगाबादचे जिल्हाधिकारी  उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत.

या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे कि , हि सर्व कामे करताना सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासाठी यांची मदत होणार आहे.गावामध्ये धान्य प्राप्त झाल्यानंतर गावात दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांच्या आणि लाभार्थ्यांच्या निदर्शनास आणावे. आणि लाभार्थ्यांच्या याद्या या स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. गावात धान्य प्राप्त झाल्यानंतर याची माहिती सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांना देण्यात यावी. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने यापूर्वी नियमित कार्यरत असणाऱ्या तीन योजना अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना आणि एपीएल शेतकरी योजना या व्यतिरिक्त इतर दोन योजना सुरू केल्या आहेत .यामध्ये मोफत तांदूळ देण्यात येत आहेत .मोफत तांदूळ हे फक्त अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना देतात.

APL शेतकरी यांना मोफत तांदूळ देण्यात येत नाहीत तसेच जे केशरी कार्डधारक आहेत ज्यांचा समावेश प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी याच्यामध्ये नाही आणि ज्यांना नेहमी धान्य प्राप्त होत नाही अशा लाभार्थ्यांना सुद्धा मे महिन्यामध्ये केशरी कार्डधारकांना धान्य मिळणार आहे.सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचे सर्व योजनांचे धान्य अंत्योदय योजना , प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना येथील शेतकरी योजना आणि मोफत तांदूळ सर्व दुकानांमध्ये पोहोचलेला असून ९० टक्के लाभार्थ्यांपर्यंत त्याचे वाटप झाले आहे. आजही स्वस्त धान्य दुकानातून उर्वरित लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येत आहे.कार्डधारकांच्या प्राप्त होणार्‍या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाभर विविध पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात येत आहे .ज्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या अशा तीन दुकानदारांचे निलंबन करण्यात आले आहे ,यामध्ये लोहगाव तालुका पैठण, गुलमंडी दुकान क्रमांक १४८ औरंगाबाद शहर आणि संघर्ष नगर दुकान क्रमांक १७८ औरंगाबाद शहर यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले‌‌ यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!