Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : काही राज्यात लॉकडाऊन कायद्याचे उल्लंघन होत असल्याने केंद्र सरकार गंभीर , महाराष्ट्रातही केंद्राचे पथक दाखल…

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये उल्लंघन होत असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच  काही राज्यांमध्ये करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याने त्या राज्यांच्या सहकार्यासाठी केंद्राने पथकं पाठवली आहेत. ही पथकं राज्यांना उपयायोजना आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात मार्गदर्शन करतील, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. यानुसार महाराष्ट्रातही केंद्राचं पथक दाखल झाले आहे.


दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून लॉकडाऊनवर केंद्र सरकारकडून सतत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून जिथेही नियमांचे उल्लंघ होत आहे तिथे योग्य ती कारवाई केली जात आहे. गृहमंत्रालयाने काल राज्यांना पुन्हा एका पत्राद्वारे योग्य त्या सूचना दिल्या आहेत.  आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जे दिशानिर्देश जारी केले आहेत त्या दिशानिर्देशांचे राज्य सरकारांनी सत्तीने पालन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार राज्य सरकारं अधिक सक्तीने   नियमांचे पालन करू शकतात. पण राज्यांनी नियमांचे पालन करताना कुचराई करू नये. सर्व राज्यांनी आणि सर्वाजनिक सेवेतील यंत्रणांनी आणि नागरिकांनी भारत सरकारने दिलेल्या आदेशाचे आणि नियमांचे देशाच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे पालन करावे, असं सुप्रीम कोर्टाने ३१ मार्चला दिलेल्या आदेशात  म्हटले आहे. याची आठवण राज्यांना पत्रातून करून देण्यात आली आहे, असे  केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यावर त्याच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले होते. पण काही राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. केंद्र सरकारचे नियम डावलून तिथे काही प्रमाणात सूट दिली गेलीय. केरळ सरकारने केंद्राच्या आदेशात काही बदल करून नवीन दिशानिर्देश जारी केलेत. या दिशानिर्देशांच्या मुद्द्यावर गृहमंत्रालयाने पत्र लिहून केरळ सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. केरळ सरकारने काही व्यवहारांना परवानगी दिली आहे. जे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत येणाऱ्या नियमांचे उल्लंघन आहे आणि लॉकडाऊनचे नियमही शिथिल होत आहेत. यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी सूचना केरळ सरकारला करण्यात आली आहे.

याबाबत  गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले कि ,  अनेक राज्यातील काही जिल्ह्यांमध्येही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला  धोका निर्माण होऊ शकतो. काही जिल्ह्यांमध्ये करोनाच्या संसर्ग वाढत असल्याने परिस्थिती गंभीर आहे किंवा गंभीर होत चालली आहे. राजस्थानमधील जयपूर, मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता, हावडा, २४ परगणा उत्तर, मिदनापूर पूर्व, दार्जिलिंग, जलपायगुडी आणि कल्याणपूर या जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर आहे. या चारही राज्यांमधील प्रभावीत जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन २००५ कायद्यानुसार गृहमंत्रालयाने विविध मंत्रालयाची मिळून ६ पथकं तयार केली आहेत. ही पथकं सूचना केलेल्या ठिकाणी पोहोचली आहे.

केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही पथकं काम करत आहेत. प्रत्येक पथकात ६ सदस्य आहेत. सर्व पथकांमध्ये वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे. उपलब्ध तंत्रज्ञांद्वारे उपाययोजना करून राज्यांना मदत करण्याचा केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे. ही पथकं हॉटस्पॉट भागात जातील. आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर राज्य सरकारांना सहकार्य करतील. तसंच लॉकडाऊन नियमांच्या पालनासह आवश्यक वस्तुंचा पुरवठा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आरोग्य सेवा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा गरीब आणि मजुरांसाठी उभारल्या छावण्यांची स्थिथी यासह इतर मुद्द्यांवर आपला अहवाल सादर करतील,  असे  गृहमंत्रालयाने स्पष्ट केले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!