Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कोरोना संसर्ग: व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक…

Spread the love

सॅनिटेशन डोम अथवा टनेलचा वापर न करण्याच्या सूचना

औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.अशी माहिती राज्राच्या आरोग्य संचालक डाॅ.अर्चना पाटील यांनी “महानायक आॅनलाईन”शी बोलतांना दिली. जागतिक आरोग्य संघटनेनेही याच्या अति वापरामुळे त्वचा आणि डोळ्याला अपाय होऊ शकतो  असे म्हटले आहे. इतर राज्यातही अशा प्रकारचे टनेल अथवा दम न वापरण्याच्या सूचना जरी करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!