Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : कोविड १९ हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैंकी काहीही पाहत नाही : पंतप्रधान

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना म्हटले आहे कि , कोविड १९ हल्ल्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जाती, पंथ, भाषा किंवा सीमा यापैंकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य – बंधुता यांना प्राधान्य देणारं असायला हवं, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लिंक्डइन’ वरून एक लेख प्रसिद्ध केला आहे. करोना संकटानंतर जगाला एका नव्या बिझनेस मॉडलची गरज असल्याची जाणीव झालीय. तरुणांची अखंड ऊर्जा असणारा भारत कोविड १९ नंतर जगाला एक नवीन मॉडेल देईल, असं या लेखात मोदींनी म्हटलंय. भारत जगाला एक नवी कार्य संस्कृती देऊ शकतो कारण हाच देश आपल्या नवोन्मेषी विचारांप्रती उत्साहासाठी प्रसिद्ध आहे, असंही यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

https://www.linkedin.com/pulse/life-era-covid-19-narendra-modi/?published=t

मोदींनी सांगितलं A, E, I, O, U चं नवं मॉडेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजी वर्णमालेतील पाच स्वर ए, ई, आय, ओ, यू वर आधारीत,

Adaptability – अनुकूलता

Efficiency – दक्षता

Inclusivity – समावेशकता

Opportunity- संधी

Universalism – सार्वभौमिकता

पंतप्रधान मोदी यांनी या गोष्टी नव्या बिझनेस आणि वर्क कल्चरसाठी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले आहे. अगदी सहज अमलात आणलं जाऊ शकेल अशा बिझनेस आणि लाईफस्टाईल मॉडेल्सची सध्या मागणी आहे. यामुळे, करोनासारख्या संकटकाळातही आपल्या कामकाजाची गती प्रभावित होणार नाही. डिजिटल पेमेंट आत्मसात करणं याचं शानदार उदाहरण आहे. दुसरं उदाहरण म्हणजे टेलिमेडिसीन… क्लिनिक किंवा हॉस्पीटलशिवाय अनेक डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत, असंही त्यांनी सांगितलंय.

या शतकाच्या तिसऱ्या दशकाची सुरुवात मोठ्या घडामोडींनी झाली. कोविड १० नं अनेक पद्धतीची नवी संकटं समोर आणून मांडील. करोनामुळे व्यावसायिक आयुष्याची मांडणीच बदलून टाकली. सध्याच्या दिवसांत घरचं नवं कार्यालय बनलंय. इंटरनेट नवं मीटिंग रुम बनलंय. आता ऑफिसमध्ये कामादरम्यान सहकार्यांसोबत थोडा विरंगुळा इतिहास बनलाय. मीदेखील हे बदलाव आत्मसात करतोय. आता बैठकीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच पार पडत आहेत. मग त्या मंत्र्यांसोबत असो, अधिकाऱ्यांसोबत किंवा मग जगभरातील नेत्यांसोबत… प्रत्येक भागाची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांशी चर्चाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच पार पडतेय. अनेक एनजीओ, सिव्हिल सोसायटी ग्रुप, सामुदायिक संस्था, रेडिओ जॉकी यांच्याशीही चर्चा झाली, असं सांगताना पंतप्रधानांनी आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या लोकांशी फोनवरून संवाद साधत असल्याचं सांगितलं.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!