Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Update : विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे तीन हजार मास्कची निर्मिती

Spread the love

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तीन हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत . विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ . प्रमोद येवले यांनी कोरोना साथीसंदर्भात (कोविड 19 ) उपाययोजना करण्यासाठी सूचना केली होती . यानूसार राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने मास्क तयार कराण्याबाबचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण रविवारी (दि. १९ ) देण्यात आले.

रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी डॉ अन्वीता अग्रवाल ‌यानी रासेयोचे स्वयंसेवक व विद्यापीठातील रोजंदारी महिला कर्मचारी यांना सोशल डिस्टंसिंग्जचे पालन करून तीन टप्यात प्रत्येकी पाच महिला असे १५ महिलांना मास्क निर्मितीचे प्रशिक्षण दिले . मास्क कसे तयार करायचे, त्याचा निश्चित अकार व शिलाई कोणत्या प्रकारे करायची याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. मास्क तयार करुन स्वच्छता विभाग व सुरक्षा विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी यांना दिले जाणार आहे . रासेयो विभागाच्या वतीने कोवीड 19 प्रतिरोध करण्यासाठी विविध ठिकाणी काम करणाऱ्या स्वंयसेवक व कार्यक्रम आधकारी तसेच गरजूंना देण्यात येणार आहे . प्रशिक्षणाला कुलसचिव डॉ जयश्री सुर्यवंशी यांनी भेट दिली . या प्रसंगी विद्यापीठ रासेयो समन्वयक डॉ टि आर पाटील यांची उपस्थिती होंती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!