Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : पवित्र रमजान काळात मुस्लिम बांधवांनी काटेकोरपणे पाळावयाचे नियम शासनाकडून जाहीर

Spread the love

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान २५ एप्रिल पासून सुरू होत असून या निमित्ताने राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाने आज अध्यादेश जारी केला असून या आदेशानुसार मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी , मोकळ्या मैदानात , घराच्या गच्चीवर नमाज अदा करता येणार नसून या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त विभागीय महसूल आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.


अल्पसंख्यांक विकास विभागाची अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी हा अध्यादेश जारी केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी १६ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मुस्लिम धर्मीय लोकांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

या आदेशात म्हटले आहे की संसर्ग होऊ नये म्हणून पवित्र रमजान महिन्याच्या काळामध्ये मुस्लिम समाजातील नमाज तरावीह व विस्तार साठी लोक एकत्र येतात मात्र सध्या स्थिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते, यामुळे कोरूना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरीत्या नमाज आदा न करणे मुस्लिम समाज बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे असल्याने सार्वजनिकरित्या मस्जिद मध्ये सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन नमाज न पढण्याच्या  सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, कोरोनाव्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक विलगीकरणाचे  पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेलय  असून पवित्र रमजान महिन्यांमध्ये या सूचनांचे कटाक्षाने पालन करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण , तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये घराच्या किंवा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार  कार्यक्रम आयोजित करू नयेत त्याचबरोबर मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण किंवा विस्तार चे आयोजन करण्यात येऊ नये कोणत्याही सामाजिक धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाजपठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य आपापल्या घरातच पार पाडावे. या विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.  शेवटी मुखर्जी यांनी म्हटले आहे की या सूचनांचे पालन करण्यासाठी मुस्लिम समाजातील धर्मगुरू सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!