Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : ” मी गाढव आहे , मला सांगितलेले कळत नाही !!” गळ्यात पाट्या अडकवूनही पुण्यातील फिरस्ते थांबेनात…

Spread the love

” मी गाढव आहे , मला सांगितलेले कळत नाही ” , ” मी अति शहाणा आहे , मी मॉर्निंग वॉकला चाललो आहे..” अशा पाट्या फिर्नरांच्या गळ्यात अडकवण्याची वेळ पुणे पोलिसांवर अली असली तरी दे    शात आणि राज्यातील सर्व शहरात संचारबंदी असताना  आणि पोलिसांकडून फिरणाऱ्या लोकांवर कितीही नियंत्रण आणले तरीही काम नसताना बाहेर फिरणारे फिरस्ते काही थांबायला तयार नाहीत दरम्यान पुण्यात अशा फिरणारी जणू स्पर्धाच लागली आहे . याच कारणावरून  पुण्यात मॉर्निग वॉकला बाहेर पडलेले पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आर. एस. कुमार यांना पोलिसांनी आज सकाळी रस्त्यावरच परेड करायला लावली. कुमार यांच्यासह निगडी परिसरातील ३५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘मी नियम मोडणार नाही,’ अशी शपथ त्यांना देण्यात आली.

माजी महापौर आर. एस. कुमार सध्या भाजपमध्ये असून त्यांच्यासह ३५ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिक सकाळी मॉर्निग वॉकला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे निगडी पोलिसांनी कालपासून मॉर्निग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. आज देखील आकुर्डी परिसरात कारवाई करण्यात आली.

दरम्यान आकुर्डी परिसरात मॉर्निग वॉकला बाहेर पडलेल्या नागरिकांकडून पोलिसांनी सूर्यनमस्कार करून घेतले. त्याचबरोबर ”मी आदेश पाळत नाही, कारण मी उच्चशिक्षित दीडशहाणा आहे’, ‘गो करोना’, ‘मी स्वार्थी आहे, मी करोना फैलावण्यास मदत करत आहे, मी मॉर्निग वॉकर’ ‘मी अतिशहाणा आहे, ‘मी मॉर्निग वॉकला चाललो आहे गो कोरोना’, ‘मी गाढव आहे, मला सांगितलेले कळत नाही’ असा मजकूर असलेले फलक हातामध्ये देऊन ‘मी नियम मोडणार नाही’ अशी शपथ सर्वांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यासाठी पोलिसांना सहकार्य केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!