Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : भावजयीकडे वाईट नजरेने का पाहता ? म्हणून विचारणाऱ्या शेजाऱ्याचा खून, दोन महिलांसहित पाच अटकेत

Spread the love

औरंगाबाद – महिलेच्या छेडछाडीवरुन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जाणार्‍या इसमाचा बेदम मारहाण करुन खून केल्या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी दोन महिलांसहित ५ जणांना अटक केली. मयत विकास झाल्टे हे महाराष्ट्र वन विभागाचे कर्मचारी होते . पाणी फाऊंडेशनसोबत पाणलोट क्षेत्रात विकासने बरीच कामे केलेली आहेत. परंतु शेजारच्या लोकांशी झालेल्या भांडत त्याचा बळी गेला.
विकास विजय झाल्टे (४३) रा.बनेवाडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर अशोक किर्तीशाही, कुणाल किर्तीशाही, सोनू भारसाखळे, प्रदीप राॅय, मनोज किर्तीशाही, मंदा भारसाखळे आणि छाया किर्तीशाही अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , १७ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास विकास ची भाऊजायी नळावर पाणी भरत असतांना ओट्यावर बसून वाईट नजरेने बघणार्‍या वरील पाच आरोपींना युवराज झाल्टे याने हाकलून देण्याचा प्रयत्न केला. आरोपी ऐकंत नाहीत असे लक्षात आल्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. भाऊ पोलिसांकडे तक्रार देण्यास गेला म्हणून युवराज चा भाऊ विकासही पोलिस ठाण्याकडे निघाल्याचे कळताच अशोक आणि कुणाल किर्तीशाही यांनी फावड्याने विकास ला मारहाण केली.तसेच सोनू भारसाखळै, प्रदीप राॅय आणि मनोज किर्तीशाही यांनी जखमी विकासला पायाखाली तुडवले.यावेळी आरोपी अशोक ची पत्नी छाया आणि सोनू ची आई मंदा यांनीही विकासला गंभीर जखमी झाल्यावरही मारहाण केली. जखमी विकासला त्याचा भाऊ प्रकाश झाल्टे ने विकासला शुक्रवारी संध्याकाळी ९च्या सुमारास घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण आज पहाटे साडेसहाच्या सुमारास विकास झाल्टे उपचारादरम्यान मरंण पावला.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भदरगे करंत आहेत..

आपलं सरकार

Click to listen highlighted text!