Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : प्रवाशांनाच चोर समजून जमावाने तिघांचा घेतला जीव …!!

Spread the love

लॉक डाउनच्या काळात पालघर येथे रात्रीच्यावेळी तीन ते चार चोर फिरत असल्याची अफवा पसरल्याने तीनजणांचा हकनाक बळी गेला आहे. काल रात्री पालघर जिल्ह्यातील एका गावात चोर घुसल्याची अफवा पसरली. त्यामुळे सुमारे शंभर जणांच्या जमावाने ३ प्रवाशांना चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत दगडाने ठेचून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात चोर फिरत असल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे येथीन लोक धस्तावले आहेत. काल रात्री दाभाडी-खानवेल मार्गावरून तीनजण मारुती इको गाडीतून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही गाडी थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने गाडीतील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देत त्यांना दगडाने ठेचून मारले. यावेळी या तिघांनी जीव वाचवण्यासाठी गयावया करत पळण्याचा प्रयत्नही केला. मात्र जमावाला त्यांची दया अली नाही आणि त्यांची प्राण ज्योत  मालवली.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरीही होते. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने शांत होण्याऐवजी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करत दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!