Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन असले तरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३० एप्रिलपर्यंत बंद

Spread the love

आणखी १५ दिवस प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी घरीच थांबणार

कोरोना संदर्भात उपायोजना करण्यासाठी देशभर प्रयत्न होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत देशात लॉक डाऊनचा निर्णय घोषित केला आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वीच ३० एप्रिल पर्यंत  लॉकडाऊन शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठ परिसर येत्या घोषित केला आहे त्यानुसार पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केलेली तारीख न धरता मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार केवळ ३० एप्रिलपर्यंतच विद्यापीठ संपूर्णतः  बंद ठेवण्याचा निर्णय   कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घोषित केला आहे. या निर्णयानुसार या काळात सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावे, असे निर्देशही  कुलगुरू यांनी दिले आहेत.

या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आस्थापना विभागातर्फे सोमवारी (दि .१३ एप्रिल ) सायंकाळी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे . यानूसार कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन येत्या ३० एप्रिलपर्यंत विद्यापीठ परिसर पूर्णतः  बंद ठेवण्यात येणार आहे, असे घोषित केले आहे . या काळात विद्यापीठ औरंगाबाद मुख्य परिसर येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग पूर्णतः बंद राहतील . तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद उपपरिसर, समाजकार्य महाविद्यालय व मॉडेल कॉलेज, घनसावंगी हेही या काळात पुर्णतः बंद राहील, असे कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी कळविले आहे .

कोरोना विषाणुचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव/प्रसार विद्यापीठ परिसर, वसतिगृहे, कार्यालयामध्ये होऊ नये तसेच अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक व तातडीची उपाययोजना म्हणून सदर निर्देश दिले गेले आहेत . सदरील आदेश वैद्यकीय विभाग, तातडीची सेवा देणारा विभाग, उद्यान विभाग, सुरक्षा विभाग, इत्यादींच्या विभागप्रमुखांना ज्यांची सेवा अत्यावश्यक वाटत असल्यास त्याबाबतीत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. सदरील आदेश ३० एप्रिल २०२० पर्यत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हे आदेश लागू केले आहेत. शिक्षकांनी तोपर्यंत घरी बसून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या संदर्भात ३० एप्रिल रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल .
सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख यांनी आपल्या अधिनस्थ कर्मचा-यांच्या सदर परिपत्रक निर्देशनास आणून द्यावे तसेच सर्व संबंधीतांनी याची नोंद घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी . तसेच ३० एप्रिलपर्यंत विद्यापीठ परिसर बंद राहील याची नोंद सर्व संलग्नित महाविद्यालये, विद्यार्थी व सर्व संबधितांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!