Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : केंद्र सरकारकडून तीन भागात देशाचे विभाजन , १७० जिल्हे हॉटस्पॉट झोनमध्ये….

Spread the love

केंद्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  तीन भागात देशाचे विभाजन केले आहे. पहिला हॉटस्पॉट जिल्हे, दुसरे कोरोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशातील जवळपास १७० जिल्हे हॉटस्पॉट घोषित केले जातील. तर हॉटस्पॉट नसलेले २०७ जिल्हे आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची घोषणा केली. यासोबतच २० एप्रिलपर्यंत देशातील प्रत्येक शहराची आणि जिल्ह्याची तपासणी केली जाईल. कुठल्या भागात आणि जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत आणि तिथे कशा प्रकारे रुग्णांवर उपचार सुरू आहेत हे बघितले जाईल. हे तपासण्यासाठी केंद्राकडून काही दिशानिर्देश जारी केले जातील, असं पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना दिशानिर्देश जारी केले आहेत.

ज्या ठिकाणी करोनाचे अधिक रुग्ण आढळून येत आहेत किंवा करोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण अधिक आहे किंवा रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे जिल्हे हॉटस्पॉटमध्ये येतात. मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्यासे कसे कंटेन्मेंट करायचे ? तसंच क्लस्टर कंटेन्मेंटचे कसे नियोजन करायचे याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. कंटेन्मेंट झोन आणि बफरमध्ये काय-काय करायचे आहे हे सांगण्यातं आलं. कंटेन्मेंट झोनमध्ये येण्या-जाण्यावर बंदी किंवा प्रवेशावर कसे नियंत्रण ठेवायचे हे सांगण्यात आले आहे.  कंटेन्मेंट झोन अत्यावश्यक सेवांशिवाय कुठल्याही हालचालींवर बंदी असेल.

विशेष पथकांद्वारे प्रत्येक घरात जाऊनत नमुने घेतले जातील. त्या नमुन्यांची चाचणी होईल. कंटेन्मेंट झोनला लागून असलेल्या बाहेर असलेल्या भागात सर्व वैद्यकीय सेवा सुरू राहतील. तसंच त्याभागातही तपासणी केली जाईल आणि नमुने घेऊन चाचण्या केल्या जातील. खासकरून श्वसनाचे त्रास असलेल्या रुग्णांची तपासणी होईल. तयार करण्यात आलेले विशेष पथक हे नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांची सर्व माहिती घेतील. या विशेष पथकांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी, पालिके कर्मचारी आणि रेड क्रॉस, एनएसएस आणि नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवकही त्यात असतील. ज्या कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची तपासणी केली जाईल तिथे ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांना शोधू काढले जाईल आणि नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.

रोज आलेली माहिती जिल्हा पातळीवर पाठवून त्यांना पुढील नियोजन केले जाईल. यासाठी आरोग्य विभाग आणि महसूल विभागासह जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांचा समावेश करण्यात येईल. त्याच्या सहभागाने कारवाई केली जाईल, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्हे ग्रीनच रहावेत यासाठी नागरिकांच्या मदतीने आरोग्य विभागाने काम करावे. नागरिकांमध्ये जनजागृती करून गरज पडल्यास तापसणीही करावी. तसंच करोना रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटलही तयार ठेवावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!