Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Maharashtra NewsUpdate : बांद्र्यातील परप्रांतीयांचे एकत्र येणे , मुख्यमंत्री , अमित शहा आणि आदित्य ठाकरे….

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजकारण न करण्याचा इशारा….

मजुरांना चिथावणी देणाऱ्या विनय दुबईला तत्काळ अटक

“आम्हाला गावी जायचे आहे…, अशी मागणी करत वांद्रे स्टेशनवर आज शेकडो मजुरांनी धडक दिली व तिथे ठिय्या दिला. दरम्यान या जमावाला उद्देशून मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदीतून संवाद साधत सरकारची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. ‘क्यों परेशान हो रहे है? असा सवाल करत त्यांनी बांद्र्यात जमलेल्या परराज्यातील मजुरांना विश्वास दिला. कि , लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नाही, हे ध्यानात घ्या. गावी जाण्याची घाई करू नका. राज्य सरकार तुमची संपूर्ण व्यवस्था करत आहे आणि यापुढेही करेल. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना आश्वस्त केले. वांद्रे येथे घडलेली घटना दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. १४ तारखेला लॉकडाऊन संपेल आणि ट्रेन सोडतील असं पिल्लू कुणी तरी सोडलं असावं आणि त्यातून हा सारा प्रकार घडला असावा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या सर्वच मजुरांना विनंती केली. तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वांद्रे येथील घटनेवरून राजकारण करणारांविरुद्ध  मुख्यमंत्र्यांनी चीड व्यक्त केली. ते म्हणाले कि , यात कुणी राजकारण करणार असेल. लोकांच्या भावनांशी खेळून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो कुणीही असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. तेव्हा आग भडकवू नका, इतकीच माझी सर्वांना विनंती आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. वरिष्ठ पातळीवरचे सर्व नेते एकजुटीने उभे ठाकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमचा राज असे सगळेच सोबत आहेत. शिवाय मुल्ला मौलवीही माझ्याशी संवाद साधत आहेत. व्हायरस जात पात धर्म पक्ष पाहत नाही, हेच या साऱ्याचे सत्य आहे. त्यामुळे जसा लढा आपण आजवर दिला आहे तसाच तो यापुढेही द्यायचा आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान मुंबई वांद्रे येथे हजारो मजुरांनी लॉकडाऊन विरोधात केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केलाय. शहा यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत वांद्रे येथील घटनेची माहिती घेतली. देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवल्यानंतर मुंबईत वांद्रे येथे इतर राज्यांतील मजुरांनी गर्दी करत ठिय्या आंदोलन केलं. इतर राज्यांमधील हजारो मजुरांनी गर्दी केल्याने वांद्रे पश्चिम भागात दुपारी चार वाजता तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांनी चर्चा करत आणि सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पण एवढ्या मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर आल्याने केंद्र सरकारने या घटनेची दखल घेतली आहे.

आदित्य ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने फोन करून वांद्रे येथे घडलेल्या या घटनेची माहिती घेतली. तसंच चिंताही व्यक्त केली. अशा घटनांमुळे करोनाविरोधी लढाई अडचणी येऊन ती कमकुवत होऊ शकते. यामुळे सरकारने अधिक सतर्क रहावं. जी काही मदत हवी ती सर्व मदत केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला द्यायला तयार आहे, असं गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.  वांद्रे येथील घटनेनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केंद्राने रेल्वे सुरू करायला हवी होती, असं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली. यामुळे केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं राजकारण सुरू झालं आहे.

दरम्यान, रेल्वे सुरू होत असल्याच्या अफेवरून वांद्रे येथे परप्रांतीय मजुरांची गर्दी झाल्याची चर्चा होती. पण लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याचे पंतप्रधान मोदींनी घोषित करताच रेल्वेनेही अत्यावश्यक वस्तुंची मालवाहतूक वगळता सर्व रेल्वे वाहतूक ३ मेपर्यंत बंद राहणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!