डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही खास पैलू …

Advertisements
Advertisements
Spread the love

जाणून घेऊयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही खास पैलू …

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रात Ph.D करणारे पहिले भारतीय आहेत.

Advertisements

२. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्राचे जनक मानतात.

Advertisements
Advertisements

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह ग्रंथालयात ५०,००० पुस्तकं होते. ( हे जगातील सर्वात मोठ खासगी ग्रंथालय होतं)

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ” वेटींग फॉर व्हिसा (Waiting for visa)” हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक आहे.

५. २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने १०० अभ्यासकांची यादी बनवली ” World’s Top 100 Scholar ” या अभ्यासकांच्या यादीत पहिले नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.

६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ६४ विषयांचे तज्ञ होते.

७. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एकूण ९ भाषा अवगत होत्या. ( मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, पाली  आणि संस्कृत)

८. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २१ वर्ष जगातील सर्व धर्मांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला.

९. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसातून २१ तास अभ्यास करून “London School Of Economics” मध्ये केवळ २ वर्ष ३ महिन्यात ३ वर्षांचा अभ्यासक्रम  पूर्ण केला.

१०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे “Doctor Of  Science” नावाची मौल्यवान डॉक्टरेटची पदवी प्राप्त करणारे जगातील पाहिले व्यक्ती आहेत. 

११. जगभरात नेत्यांच्या नावावर लिहिण्यात आलेल्या पुस्तक आणि गाण्यांपैकी  सर्वाधिक गाणी  आणि पुस्तकं  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिण्यात आलेली आहेत.

१२. लॉर्ड लीनलिथगो आणि महात्मा गांधी यांचा असा विश्वास होता की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ५०० पदवीधर आणि हजारो विद्वानांपेक्षा बुद्धिमान आहेत.

१२. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या ” The Maker Of Universe”, जागतिक सर्वेक्षणात गेल्या १० हजार वर्षांच्या १०० मानवतावादी लोकांच्या यादीत, चौथे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते.

१३. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नोव्हेंबर १९४२ ला नवी दिल्लीत झालेल्या “भारतीय कामगार परिषदेच्या” १२ व्या अधिवेशनात कामकाजाचे तास १२ तासांवरून ८ तास केले. तसेच त्यांनी कामगारांसाठी महागाई भत्ता, रजेचा लाभ , कर्मचारी विमा, वैदाकिय रजा, समान कामासाठी समान वेतन, किमान वेतन, नियमित पगाराची अधिसूचना यासारख्या अनेक उपाययोजना सुचविल्या.

१४. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार संघटना बळकट करून भारतात रोजगारनिर्मितीची स्थापना केली.

१५. डॉ. बाबासाहेब  आंबेडकर हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी ३ वर्ष लढले, आणि महिलांना अनेक महत्त्वपूर्ण हक्क मिळवून दिले.

१६. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या पहिल्या कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला जेव्हा भारतीय संसदेने सर्वंकष हिंदू कोड बिल डावलले. त्या विधेयकाचे दोन मुख्य उद्दिष्टे होती;

    १. हिंदू स्त्रियांना त्यांचा हक्क देऊन त्यांचा सामाजिक दर्जा उंचावणे.

    २. सामाजिक असमानता आणि जातीय विषमता रद्द करणे.

१७ . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत महत्वाचे योगदान होते.

१८. मूकनायक आणि बहिष्कृत भारत च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली.

१९. पुरुषांबरोबर महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे.

२० . पुणे करार हे डॉ . बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रकरण आहे . त्यामुळेच त्यांना महात्मा गांधी यांचे तारणहार म्हटले जाते .

२१. मुंबई लॉ कॉलेजचे प्राचार्य असताना बाबासाहेबांना वरिष्ठ न्यायमूर्ती म्हणून संधी मिळाली होती परंतु राजकारणाला प्राधान्य देऊन त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही.

आपलं सरकार