Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविताना , देशवासियांना नेमकं काय म्हणाले पंतप्रधान ?

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केली. आतापर्यंत ज्या पद्धतीनं शिस्तीचं पालन केलं, अगदी त्याचप्रमाणे पुढच्या काळातही शिस्तीचं पालन करावं. एकाही व्यक्तीला करोना होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन मोदी यांनी केलं. त्याचबरोबर करोनाचे हॉटस्पॉट निर्माण होणार नाही, याची खबरदारी म्हणून चालू आठवड्यात लॉकडाउनच्या नियमांची कठोर अमलबजावणी केली जाईल, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि , अनेक राज्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांनी, तज्ज्ञांनी आणि नागरिकांनी लॉकडाउन वाढवण्याची शिफारस केली होती. येणाऱ्या काळात करोनाला पसरू द्यायचं नाही. स्थानिक पातळीवर रुग्ण वाढला तर चिंतेची बाब असेल. कुणाचा करोनामुळे मृत्यू झाला. तर ही सुद्धा काळजी करण्याची गोष्ट आहे. करोनाचा उद्रेक झालेल्या हॉटस्पॉटवर विशेष लक्ष केंद्रीत करून काळजी घेण्याची गरज आहे. नवीन हॉटस्पॉट नवं संकट घेऊन येतील. हे थांबवण्यासाठी पुढील एका आठवड्यासाठी लॉकडाउनच्या नियमांची कठोर अमलबजावणी केली जाणार आहे. या काळात गावं आणि शहरांमधील परिस्थितींवर बारकाईनं नजर ठेवली जाणार आहे. त्याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल आणि हॉटस्पॉट निर्माण होण्याचा धोका निवळेल अशा ठिकाणी २० एप्रिलनंतर नियमांमध्ये थोडी शिथिलता आणली जाईल.

भारतीय नागरिकांच्या धैर्याविषयी बोलताना ते म्हणाले कि , “करोनापासून होणारं नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे. शिस्तबद्ध रितीनं भारतीयांनी कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचं स्वागत देशभऱात झालं, परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे.”

“जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने करोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. करोनाचे बाधित १०० होण्याच्या आधीच भारतानं विदेशी नागरिकांसाठी १४ दिवसांचं विलगीकरण केले. करोनाचे फक्त ५५० बाधित भारतात होते तेव्हाच भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असं संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातल्या बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येतं की भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

“महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणास मुकलीत. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही. परंतु या अनुभवातून हे स्पष्ट झालंय की आपण जो रस्ता निवडला तोच बरोबर आहे. सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाउनचा खूप फायदा झालाय. फक्त आर्थिक बाजू बघितलं तर खूप महाग पडल्याचं दिसू शकतं, खूप किंमत चुकवायला लागली, परंतु जिवितापेक्षा मोठं काही नाही,” असं नरेंद्र मोदींन यावेळी म्हटलं.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

– भारताची लढाई मोठ्या हिम्मतीने सुरू आहे. नागरिकांच्या त्यागामुळे कोरोनामुळो होणाऱ्या नुकसानीला बऱ्यापैकी आवरण्यात यशस्वी झालो आहोत.

– तुम्हाला होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. कोणाला अन्न नाही, प्रवासी अडकले, पण तरी तुम्ही आपले कर्तव्य सोडले नाही.

– प्रत्येकजण सैनिकाप्रमाणे कर्तव्य बजावत आहात. मी तुम्हाला आदरपूर्वक सलाम करतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो

– आंबेडकरांना देशाने संयमाद्वारे श्रद्धांजली वाहिली

– लोकांचा हाच संयम प्रेरणादायी आहे

– आपल्या देशात कोरोना येण्याआधीच एअरपोर्टवर लोकांची स्क्रिनिंग सुरू करण्यात आली

– आपल्या देशात 550 रुग्ण होते तेव्हा भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला

– समस्या दिसली तेव्हाच आपण उपाययोजना केल्या

– अनेक सार्वजनिक स्थळं तातडीने बंद केली

– देशात येणाऱ्या प्रत्येकाला 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यावर निर्बंध घातले

– वेळीच हे सगळे निर्णय घेतले नसते तर आता भारतीची स्थिती काय असती याचा विचार करणंही अंगावर काटा आणतात

– सोशल डिस्टिंसिंग आणि लॉकडाऊनमुळे मोठा फायदा देशाला झाला आहे

– आर्थिकदृष्ट्या पाहता हे खूप महाग आहे. याची मोठी किंमत मोजावी लागली. पण देशातील लोकांच्या जीवापुढे याची काही किंमत नाही

– इतर देशांपेक्षा भारतात स्थिती आटोक्यात आहे

– भारतातही कोरोनाच्या विरोधात लढाई जिंकण्यासाठी सगळ्यांकडून सांगण्यात आलं की लॉकडाऊन वाढवण्यात यावं

– काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्यातही आलं

– भारतामध्ये ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!