Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : देशात आणि राज्यात वाढू लागले कोरोनाचे रुग्ण , जाणून घ्या सध्याची परिस्थिती…

Spread the love

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून दरम्यान २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या १२ तासांत राज्यात १२१ करोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २४५५वर गेली आहे. तर देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०३६३ इतकी झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील करोना रुग्णांची गेल्या १२ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात १२ तासांत १२१ करोना बाधित आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे ९२ करोना रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईच्या आसपासच्या परिसरातील नवी मुंबईत १३, ठाण्यात १०, वसई-विरारमध्ये ५ आणि रायगडमध्ये एक रुग्ण आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १२ तासांत आढळलेले सर्व रुग्ण हे मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील आहेत. १२ तासांत मुंबई आणि आसपासचा परिसर वगळता इतर ठिकाणच्या रुग्णांची नोंद झाली नाही.

दरम्यान, धारावीत आज ७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकाचा स्वॅब रिपोर्ट यायचा बाकी आहे. धारावीतील एकूण करोना रुग्णांचा आकडा ५५वर गेला असून मृतांचा आकडा ८वर गेला आहे. धारावीतील करोना बाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे धारावीतील अनेक भाग सील करण्यात आले असून संशयितांची युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे.

दरम्यान भारताने कोरोनाग्रस्त रुग्णांचा दहा हजारांचा टप्पा पार केला असून  देशात आतापर्यंत १०,३६३  कोरोना व्हायरसचे  रुग्ण आढळले आहेत. तर जवळपास १ हजार ३६ रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये ३९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मंगळवारी सकाळी एकूण मृतांचा आकडा ३३९ वर पोहोचला. संसर्ग झालेल्यांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १२११ नवीन कोरोना ग्रस्त तर जवळपास ३१लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिल्लीत, कोरोना विषाणूचे सर्वाधिक ३५६ नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रूग्णांपैकी ३२५ जण जमातशी संबंधित असून आतापर्यंत मरकज संबंधित एकूण १०७१ लोक सकारात्मक आढळले आहेत. या ३५६ नव्या घटनांसह दिल्लीतील रूग्णांची एकूण संख्या १५१० पर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील चार लोकांच्या मृत्यूसह मृतांचा आकडा २८ वर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांत १४लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी नोंदवलेल्या ३५६ नवीन प्रकरणांपैकी ३२५ प्रकरणे एकाच साखळीतून समोर आली आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!