Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusAurangabad Latest update : औरंगाबादेत आज आणखी एक पॉझिटिव्ह , एकूण रुग्णांची संख्या २५ तर दोघांचा मृत्यू

Spread the love

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार औरंगाबाद  शहरात आज एक आणखी पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने कोरोनाग्रस्त एकूण रुग्णांची संख्या 25 झाली आहे त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती उपचारानंतर आपल्या घरी गेली आहे.
औरंगाबाद शहरातील दैनिक संशयितांची संख्या  159 अशी असून एकूण संशयित रुग्णांची संख्या 3 हजार 69 इतकी  आहे.  44 लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. एकूण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 580 इतकी असून 44 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  आज पर्यंत एकूण 840 लोकांची तपासणी केलेली आहे . 3069 व्यक्तींचा  चौदा दिवसांचा पाठपुरावा करण्यात आला आहे .  याशिवाय आज कुठल्याही व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले नाही. दरम्यान  73 लोकांना क्वारंटाईनसाठी भरती करण्यात आले आहे.  सध्या अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 73 इतकी आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासीतांची   संख्या 1097 असून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे.

दरम्यान औरंगाबाद महापालिकेच्यावतीने महापौर नंदकुमार घोडेले आणि आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मार्च  नंतर परदेशातून आलेल्या व्यक्तींची संख्या 196 इतकी असून 14 मार्च नंतर इतर जिल्ह्यातून आलेल्या या व्यक्तींची संख्या 2001 इतके आहे . दरम्यान महापालिकेने केलेल्या तपासणी नुसार संशयितांची संख्या 139 इतकी असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार  करण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरात होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 2412 इतकी आहे.
ज्या भागात कोरोनाचे  रुग्ण आढळून आलेल्या  आरेफ कॉलनी, पदमपुरा, सिडको एन ४ ,  जलाल कॉलनी, कासलीवाल मिटमिटा, पेशवे नगर , सातारा , देवळाई,  अहबाब कॉलनी ,  किराडपुरा,  यादव नगर या भागातीळ परिसर सील करण्यात आला असून या भागात 103 जणांच्या टीम कार्यरत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!