Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : अवैधरित्या दारूचा साठा करणारा गजाआड, ५४ हजाराची देशी दारू जप्त

Spread the love

औरंंंगाबाद : अवैधरित्या दारुचा साठा करुन त्याची विक्री करणा-याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१४) गजाआड केले. अवैध दारू विक्री करणा-याच्या ताब्यातून पोलिसांनी ५४ हजार ६०० रुपये किंमतीचे २१ देशी दारुचे बॉक्स जप्त केले आहे. बाबासाहेब सुभाष सोनवणे (वय ३८, रा. जगदंबानगर, जोगेश्वरी ता. गंगापुर) असे अवैधरित्या दारूचा साठा करून विक्री करणा-याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख हे आपल्या पथकासह एमआयडीसी वाळुज परिसरात गस्तीवर असतांना, जोगेश्वरी परिसरातील जगदंबानगरात एक जण अवैधरित्या दारूचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अमोल देशमुख यांनी आपल्या पथकासह एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांना सोबत घेवून जगदंबानगर येथील बाबासाहेब सोनवणे याच्या घरावर छापा मारून सोनवणे याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने सदरचा दारूचा साठा संदिप पिंपळे व लखन शंकर पिंपळे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, जमादार संजयसिंह राजपूत, विठ्ठल सुरे, अमर चौधरी, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड व एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याचे कर्मचारी सोनवणे, नवाब, सोहळे, शेख बाबर, संतोषकुमार बोर्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!