Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : Positive News : ” त्या ” पोलीस अधिकाऱ्याचा तुटलेला हात जोडला….मुख्यमंत्र्यांनी मानले डॉक्टरांचे आभार !!

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान संचारबंदीत सुरक्षेवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करून माथेफिरूंनी एका पोलिस अधिकाऱ्याचा हात कापल्याची घटना काल  पतियाळा जिल्ह्यात घडली होती . या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्याला तातडीने चंदिगडमधील PGIMER हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.  या शस्त्रक्रियेनंतर पोलीस अधिकाऱ्याचा हात जोडण्यात डॉक्टरांना यश आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एएसआय हरजीत सिंग यांच्यावर जवळपास साडेसात तास शस्त्रक्रिया चालली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका टीमकडून ही शस्त्रक्रिया केली गेली. डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी स्टाफचा मी आभारी आहे, असं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितलं. पतियाळा जिल्ह्यातील सनौर शहरातील गुरुद्वाराच्या परिसरामध्ये सकाळी ६.१५ वाजता ही घटना घडली. संचारबंदीमुळे बाजाराबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. यावेळी आलेले माथेफिरूंनी बॅरिकेड्स तोडून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना आडवले. या रागातून त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यात पोलिसाचा हात कापण्यात आला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरजीत सिंग हे यात जखमी झाले. ते मदत मागत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हरजीत यांना त्यांचा कापलेला हात दिला आणि दुचाकीवरून त्यांना तेथून नेण्यात आल्याचं व्हिडिओ क्लीमध्ये दिसून आलं. या घटनेनंतर हल्लोखोर पळून गेले होते.

संचारबंदी असल्याने भाजीबाजारामध्ये फिरत असल्याबद्दल चौकशी केल्याच्या रागातून एका शस्त्रधारी गटाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. यात सहायक पोलीस उपनिरीक्षकासह आणखी दोन पोलीस जखमी झाले. पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यात आज सकाळी ही घटना घडली.  पोलिसांवरील या हल्ल्या प्रकरणी काही तासांच्या आत ८ हल्लेखोरांना अटक करणअयात आली आहे. बलबेरा गावाजवळ असलेल्या एका गुरुद्वारामधून त्यांना अटक केली गेली. हल्लेखोर बाहेर येण्यास तयार नव्हते. त्यांना पकडण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केली. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हल्लेखोरांकडून तलवारी, रोख रक्कम आणि भांग जप्त करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!